एसएमबीटी हॉस्पिटल,जय मातादी मित्र मंडळ,जय मातादी फाउंडेशन,एकता महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ४ ऑक्टोबर रोजी श्रीरामपूरात मोफत आरोग्य ...
एसएमबीटी हॉस्पिटल,जय मातादी मित्र मंडळ,जय मातादी फाउंडेशन,एकता महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने
४ ऑक्टोबर रोजी श्रीरामपूरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सामान्य नागरिकांना दर्जेदार व मोफत आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी तसेच विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळावा या उद्देशाने एसएमबिटी हॉस्पिटल, जय मातादी मित्र मंडळ,जय मातादी फाउंडेशन, एकता महिला मंच श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर शनिवार, दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत जय मातादी सांस्कृतिक भवन, आदर्श नगर, दत्त मंदिरासमोर, दशमेश नगर, श्रीरामपूर येथे भरविण्यात येणार असुन एसएमबीटी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांची टीम येणार आहे तसेच शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज श्रीरामपूर येथील विद्यार्थ्यांचे सहकार्यही लाभणार आहेत. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली खालील आजारांची तपासणी व उपचार केले जाणार असून हृदयरोग व मोफत ईसीजी तपासणी – छातीत दुखणे, चालताना दम लागणे, हृदयाशी संबंधित आजार, मधुमेह व रक्तदाब तपासणी, श्वसन विकार, दमा व ऍलर्जी तपासणी, हाडांचे व संधिवाताचे विकार - सांधेदुखी, पाठदुखी, हाड मोडणे, स्त्रीरोग व अस्थिरोग तपासणी, मेंदूविकार – उचक्या, थरथरणे, लकवा, स्मृतिभ्रंश,
सर्जरी
हर्निया, हायड्रोसिल, मूळव्याध, पित्ताशयातील खडे
सर्वसाधारण आरोग्य तपासणी – शुगर, ब्लड प्रेशर, ब्लड ऑक्सिजन, ईसीजी
शिबिरादरम्यान आवश्यक रुग्णांना पुढील उपचारांसाठी विशेष मार्गदर्शनही दिले जाणार आहे. हा उपक्रम महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत रुग्णांसाठी मोफत असून, सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुला आहे. शिबिरासाठी नोंदणी शिबिराच्या दिवशी जय मातादी सांस्कृतिक भवन, आदर्श नगर, दत्त मंदिरासमोर, दशमेश नगर, श्रीरामपूर येथे होईल, नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन या शिबिराचे आयोजक जय मातादी मित्र मंडळ व जय मातादी फाउंडेशन,एकता महिला मंच श्रीरामपूर यांचे वतीने कडून करण्यात आले आहे.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
No comments