न्हावी च्या शारदा विद्यालयातील उपशिक्षक प्रवीण वारके जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) - य...
न्हावी च्या शारदा विद्यालयातील उपशिक्षक प्रवीण वारके जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
- येथील शारदा विद्यालयातील उपशिक्षक प्रवीण मधुकर वारके यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्याकडून जीवनगौरव पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना संस्थेच्या अध्यक्ष संदीपा वाघ यांच्या हस्ते व शिक्षण तज्ञ मनीषा पाटील, सेवानिवृत्त प्रा. डी एम ललवाणी, शालिग्राम मालकर, प्रा. सुनील गरुड ,ज्ञानेश्वर वाघ यांच्या उपस्थितीत देण्यात आला. प्रवीण वारके सरांचे सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, प्रशासन आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. या कार्यामुळे समाजातील विविध घटकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभ मिळत आहे. हे कार्य व योगदान लक्षात घेता त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार घेताना त्यांचे कुटुंबीय व सहकारी उपस्थित होते.त्याबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.
No comments