कोल्हापूर हादरले, खून करून आलो मुलींकडे लक्ष द्या: डोळ्यात चटणी टाकून पत्नीवर सपासप वार पत्नीला संपविले, पतीला ठोकल्या बेड्या..!! संभाजी...
कोल्हापूर हादरले, खून करून आलो मुलींकडे लक्ष द्या: डोळ्यात चटणी टाकून पत्नीवर सपासप वार पत्नीला संपविले, पतीला ठोकल्या बेड्या..!!
संभाजी पुरीगोसावी ( कोल्हापूर जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कोल्हापुरात एक हादरवणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यात पतीने पत्नीचा निर्घृणपणे खून करून पळ काढला आहे. ही घटना कोरेगांव भादोलोच्या रस्त्यावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. पती प्रशांत पाटील याने आपल्या कौटुंबिक वादांतून धारदार शस्त्राने पत्नी रोहिणी पाटील हिच्यावर सपासप वारवार तरी तिचा खून केला आहे. हल्ल्याआधी प्रशांतने रोहिणीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली होती असे असतानाही रोहिणीने अंधारात हातावर वार झेलत वाचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रशांच्या जीवघेण्या हल्ल्यापुढे तिचे काही चालू शकले नाही. प्रशांतने कट रचून रोहिणीला संपविल्याने गावातही एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून पत्नीचा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. खून करून प्रशांत हा फरार झाला होता अखेर वडगांव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. भादोले येथील प्रशांत पाटील हा पत्नी रोहिणी हिच्यासमवेत तिच्या माहेरी ढवळी येथे वडील आजारी असल्याने आठवडाभरांपासून ये-जा करीत होते. सोमवारी दोघेही वडिलांना भेटण्यासाठी निघाले असता प्रशांतने भादोले कोरेगांव झुंजीनाना मळ्यात अचानक गाडी थांबवली. प्रशांत याने रागांच्या भरात पत्नी रोहिणीचा कौटुंबिक वादांतून पत्नीला संपविले, घटनेची माहिती मिळताच वडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे व अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. त्यानंतर संशयित पती प्रशांत पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
No comments