यावल महाविद्यालयात सेवा पंधरवडा निमित्त स्वच्छता अभियान भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) येथील जळगाव जिल्ह...
यावल महाविद्यालयात सेवा पंधरवडा निमित्त स्वच्छता अभियान
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह - समाजाचे,कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सेवा पंधरवडा निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.सेवा सेवापंधरवडा अभियानात महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.यावल येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सेवा पंधरवडा निमित्त स्वच्छता अभियान संपन्न झाले. दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 दरम्यान संपूर्ण भारतात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. महाविद्यालयात सेवा पंधरवडा निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. संपूर्ण महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला.स्वयंसेवकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगण्यात आले.आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा सर्व स्वयंसेवकांनी घेतली.
कार्यक्रमाला प्रा.डॉ.पी.व्ही. पावरा (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) प्रा.आर.एस.शिरसाठ ( महिला कार्यक्रम अधिकारी)प्रा.सी.टी.वसावे (राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी) आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments