adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रभात विद्यालय हिंगोणा येथे इंटेंसिफाइड कॅम्पजियन अंतर्गत कार्यशाळा

 प्रभात विद्यालय हिंगोणा येथे इंटेंसिफाइड कॅम्पजियन अंतर्गत कार्यशाळा   भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक   ...

 प्रभात विद्यालय हिंगोणा येथे इंटेंसिफाइड कॅम्पजियन अंतर्गत कार्यशाळा  


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज दिनांक   19/09/2025 रोजी  प्रभात विद्यालय हिंगोणा तालुका यावल येथे इंटेंसिफाइड कॅम्पजियन अंतर्गत किशोरवयीन मुलांना मार्गदर्शन पर आयोजन सामान्य रुग्णालय जळगाव, जिल्हा एड्स नियंत्रण पथक जळगाव  तसेच प्रभात विद्यालय हिंगोणा चे मुख्याध्यक श्री मनोहर गाजरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ICTC विभाग ग्रामीण रुग्णालय यावल अंतर्गत करण्यात आले त्यात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून  ICTC विभाग चे समुपदेशक वसंतकुमार संदानशिव, RKSK समुपदेशक कांचन चौधरी,लिंक वर्कर पवन जगताप हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षिका श्रीमती सुजाता बोरोले ह्या होत्या. इंटेंसिफाइड कॅम्पजियन कार्यक्रम अंतर्गत किशोरवयीन मुला मुलींना HIV AIDS आणि गुप्त रोग,  शारीरिक ,सामन्य जीवन बदल या विषयी समुपदेशक वसंतकुमार संदानशिव यांनी विद्यार्थ्यांना चर्चे तून मार्गदर्शन केले लिंक वर्कर पवन जगताप यांनी किशोर वयीन मुलांच्या व्यसन पासून  सुरक्षा कशी बाळगावी या विषयी माहिती दिली  तसेच श्री कांचन चौधरी यांनी किशोर वयीन मुलांच्या समस्या आणि स्टेजेस विषयी माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एम एम सपकाळ सर यांनी केले आणि श्री डी एम लोखंडे  आभार प्रदर्शन  यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती मंगला सोनवणे, श्री किरण ठाकूर, जे आर बिरपण सर, श्री एम डी बडगुजर सर, श्रीमती किर्ती पाटील मॅडम आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले

No comments