सर्वांनी एकतेने सामाजिक सौहार्द जपत नवरात्रोत्सव साजरा करावा - डीवाय एसपी सुभाष ढवळे रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत ग...
सर्वांनी एकतेने सामाजिक सौहार्द जपत नवरात्रोत्सव साजरा करावा - डीवाय एसपी सुभाष ढवळे
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
"नवरात्र दुर्गा उत्सव हा भक्ती आनंदाचा उत्सव आहे.सर्वांनी एकतेने सामाजिक सौहार्द जपत नवरात्रोत्सव साजरा करण्याचे आवाहन सावदा पोलीस स्टेशनमध्ये आयोजित
नवरात्र दुर्गा उत्सवाच्यानिमित्ताने शांतता समितीच्या बैठकीत मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष ढवळे यांनी केले
यावेळी त्यांनी आगामी नवरात्र सण सर्वानी एकतेने शांततेत व एकोप्याने हर्षोल्लासात गुण्यागोविंदाने साजरा करण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले..
सावदा पोलीस स्टेशनच्या आवारात सकाळी १० वाजता नवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर
शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. येत्या नवरात्रोत्स दरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, सामाजिक एकात्मता जातिय सलोखा भाईचारा अखंडीत राहावा व नवरात्र उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
शांतता समितीच्या बैठकीस मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी नवरात्रोत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे दुर्गा उत्सव मंडळ कार्यकर्ते व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे आपली जबाबदारी समजून उत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, उपनिरीक्षक अमोल गर्जे, उपनिरीक्षक राहुल सानप पोलीस स्टेशन हद्दीतील पत्रकार बांधव, दुर्गा उत्सव मंडळांचे पदाधिकारी, हिंदू-मुस्लिम समाजाचे मान्यवर, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीच्या सदस्या तसेच पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते
बैठकीदरम्यान दुर्गा उत्सवाच्या आयोजनात येणाऱ्या विविध अडचणींवर चर्चा करण्यात आली.
मंडळ पदाधिकारी व मुस्लिम बांधवांचे मुद्दे शांततेत ऐकून घेऊन त्यावर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले.नवरात्र उत्सव काळात कायदा -सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान उपस्थित सर्व शांतता समितीचे सदस्य, दुर्गा उत्सव मंडळ पदाधिकारी तसेच दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. सर्वांनी मिळून एकोप्याने व धार्मिक सौहार्दाच्या वातावरणात उत्सव पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करीत आश्वासन दिले यावेळी बैठकीसाठी सावदा पोलीस स्टेशनचे पो हे कॉ निलेश बाविस्कर, गोपनीय शाखेचे पो कॉ मयुर पाटील,पो कॉ राहुल येवले,पो कॉ राजेंद्र बोदडे यांच्या सह पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले


No comments