नवरात्रोत्सव एकोपा बंधुभाव आनंदाने शांततेत साजरा करावा - सपोनि हरिदास बोचरे रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) राव...
नवरात्रोत्सव एकोपा बंधुभाव आनंदाने शांततेत साजरा करावा - सपोनि हरिदास बोचरे
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशन तर्फे विवरे बुद्रुक येथे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी निंभोरा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांनी
आपल्या गावातील आगामी नवरात्र उत्सव व विविध सणाचे आयोजन शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे तसेच नवरात्रोत्सव एकोपा बंधुभाव आनंदाने शांततेत साजरा करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले
“गावातील नवरात्र उत्सव हा उत्साहात, बंधुभावाने आणि शांततेत पार पडावा.”
असे आवाहनही केले
शांतता समितीच्या बैठकीला सरपंच युनुस तडवी, सदस्य युसुफ खाटीक, पोलिस पाटील योगेश महाजन, पंकज बेंडाळे, गोपनीय शाखेचे पो हे कॉ अमोल वाघ सुनिल पवार तसेच विवरे बुद्रुक व विवरे खुर्द येथील दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने तर निंभोरा पोलीस स्टेशन चे कर्मचारी उपस्थित होते.

No comments