खडसे महाविद्यालयात शिक्षक दिन संपन्न मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी सं...
खडसे महाविद्यालयात शिक्षक दिन संपन्न
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित, श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात दिनांक ०५ सप्टेंबर २०२५ रोजी महाविद्यालयातील गणित विभागाद्वारे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. दीपक बावस्कर यांची उपस्थिती होती. आपल्या अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य साळवे यांनी विद्यार्थ्यांनी आदर्श शिक्षकांच्या कार्याचा आपल्या जीवनात अंगीकार करावा व स्व विकासासोबत समाजाचा विकास करावा असे उपस्थितांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. दीपक बावस्कर यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून उपस्थितांना शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करून शिक्षकांसारखे गुण आपल्या अंगी रुजवावे असा संदेश दिला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.एम.पाटील (गणित विभाग प्रमुख)यांनी केले. त्यात त्यांनी कार्यक्रमाची आयोजनामागील भूमिका व महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी ममता मोरे व आभार वनिता काळे यांनी मानले.या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व गणित विभागातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

No comments