adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धनाजी नाना महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने लोहारा येथे मोफत रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी व संसर्ग जन्य आजार जनजागृती शिबिर

  धनाजी नाना महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने लोहारा येथे मोफत रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी व संसर्ग जन्य आजार जनजागृती शिब...

 धनाजी नाना महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने लोहारा येथे मोफत रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी व संसर्ग जन्य आजार जनजागृती शिबिर 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने लोकसेवक मधुकरराव चौधरी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा,लोहारा तालुका रावेर येथे रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी तसेच संसर्गजन्य आजाराबद्दल जनजागृती शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार श्री शिरीष दादा चौधरी, व संस्था चालक मंडळ, 


धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र बी वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटिका मा. सौ. अंजुमताई जमादार,(सरपंच, लोहारा ग्रामपंचायत)डॉ. राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य, धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख अतिथी युवानेते श्री धनंजय भाऊ चौधरी ( संचालक, सातपुडा विकास मंडळ, पाल), मा. श्रीमती शितल पाटील (मुख्याध्यापिका, लोकसेवक मधुकरराव चौधरी माध्यमिक आश्रम शाळा, लोहारा),  मा. श्री सुनिल सपकाळे (मुख्याध्यापक, लोकसेवक मधुकरराव चौधरी प्राथमिक आश्रम शाळा, लोहारा)लोहारा येथील लियाकत जमादार,माजी सरपंच ग्रामपंचायत, श्री . अर्जुन पवार, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ हरीश जी. नेमाडे यांची उपस्थिती लाभली, यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक विभाग प्रमुख प्रा सुवर्णा पाटील यांनी शिबिराचे आयोजनामागील उद्देश तसेच संसर्गजन्य आजार म्हणजे काय? त्यांचा प्रसार व त्यापासून स्वतःची काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुणे श्री. धनंजय भाऊ चौधरी यांनी रक्तगट तपासणी व हिमोग्लोबिन चाचणी चे दैनंदिन जीवनातील महत्त्व व अशा प्रकारच्या शिबिराच्या आयोजनाचे महत्त्व व रक्तगट बद्दल सविस्तर माहिती दिली व मुख्याध्यापिका श्रीमती शितल पाटील, यांनी विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना या शिबिराचा प्रचंड उपयोग होईल व यातून संसर्गजन्य आजाराची माहिती समजावून निरामय आरोग्याकडे विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांची वाटचाल सुरू होईल असे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांनी रक्तगट कोणते असतात, हिमोग्लोबिन व रक्ताशी संलग्नित असलेले आजार व विविध संसर्गजन्य आजार याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच विद्यार्थी, शिक्षक व गावकरी यांना मोफत शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले यासोबत विद्यार्थी, शिक्षक, पालक व गावकऱ्यांनी शिबिराला प्रोत्साहन दिले याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तृतीय वर्ष सूक्ष्मजीवशास्र विभाग कु. तेजस्विनी चौधरी व कु.सपना वानखेडे यांनी व्यक्त केले. यावेळी या मोफत शिबिरात लोकसेवक मधुकरराव चौधरी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा लोहारा असे एकूण १४० विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी व हिमोग्लोबिन चाचणी करण्यात आली. या शिबिरात एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व शिबिरासाठी विभागाचे प्रा जयंत भारंबे, प्रा योगेश पाटील, प्रा. वसीम शेख प्रयोगशाळा सहाय्यक श्री महेंद्र चौधरी, व स्थानिक शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि गावकरी यांचे विशेष सहकार्य लाभले.

No comments