आदिवासी कोळी महादेव समाजाला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी १०१६ शिवलिंगी महादेवाचे दर्शन घेऊन बोरखेड/ तारापूर / पलढग ग्रामपंचायत स...
आदिवासी कोळी महादेव समाजाला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी १०१६ शिवलिंगी महादेवाचे दर्शन घेऊन बोरखेड/ तारापूर / पलढग ग्रामपंचायत समोर अन्नत्याग उपोषणाला सुरुवात
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मोताळा:- भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण झाली मात्र बुलढाणा जिल्ह्यामधील आदिवासी कोळी महादेव समाजाला खरे स्वातंत्र्य मिळाले नाही
भारत देश संविधानावर चालते ग्रॅज्युएटवर नाही आदिवासी कोळी महादेव समाजाला घटनेमध्ये कलम 342 नुसार आरक्षण आहे
आम्ही आरक्षण मागत नसून जात प्रमाणपत्र मागत आहोत महसूल विभागातील अधिकारी प्रांत अधिकारी हे हेतू पुरस्कार आम्हाला जात प्रमाणपत्र देत नाही
आमच्या बापाकडे जात प्रमाणपत्र आहे मात्र मुलाला मिळत नाही मोठ्या भावाकडे आहे लहान भावाला मिळत नाही ही एक प्रकारची हुकूमशाही महसूल प्रशासनाची चालू आहे
बुलढाणा जिल्ह्यामधील अनेक गावे ज्या गावांमध्ये महादेव कोळी यांचे वास्तव्य आहे ते गावी आदिवासी म्हणून घोषित झाले आहे
उदाहरण बोरखेड ग्रामपंचायत हे नऊ सदस्यांची ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतला सहा सदस्य अनुसूचित जमातीचे राखीव आहे सन 2011 च्या जनगणनेनुसार या ग्रामपंचायतची लोकसंख्या 2176 असून 1577 लोक हे अनुसूचित जमातीचे आहेत तलाठी मंडळ अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी यांच्या चौकशी अहवालामध्ये आम्ही आदिवासी असल्याचे नमूद आहे महसूल प्रशासन दुतर्फी भूमिका या ठिकाणी घेत आहे एका बाजूने आम्ही आदिवासी आहे असे चौकशीमध्ये म्हणतात मात्र आम्हाला जात प्रमाणपत्र देत नाही
कोळी समाजाचे वास्तव्य असलेल्या अनेक ग्रामपंचायतीमध्ये ठक्कर बाबा आदिवासी योजनेअंतर्गत कोट्यवधी निधी शासन देत आहे मात्र जात प्रमाणपत्र का देत नाही आमचा प्रश्न आहे.
कोळी समाजातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र नसल्यामुळे अनुसूचित जमातीची सुविधा मिळत नाही शिष्यवृत्ती मिळत नाही जात प्रमाणपत्र नसल्यामुळे उच्च शिक्षण घेता येत नाही
महाराष्ट्र मधील तमाम राज्यकर्त्यांना राजकारण्यांना आमदार खासदारांना महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सदबुद्धी द्या आणि महादेव कोळी समाजावर होणारा अन्याय दूर करा असे साकडे महादेव चरणी उपोषणकर्त्यांनी केले.
No comments