adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भगवान चिपळूणकर लोटे अपघात प्रकरणी दोषी वाहन चालकावर व गाडी मालकावर RTO विभागामार्फत कारवाई करण्याचे आदेश वडिलांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळविण्यासाठी मुलगा वैभव चिपळूणकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्न ⭕ RTO,रत्नागिरी विभागाकडून स्कॉड पथकाद्वारे वाहनावर कारवाईचे आदेश

  भगवान चिपळूणकर लोटे अपघात प्रकरणी दोषी वाहन चालकावर व गाडी मालकावर RTO विभागामार्फत कारवाई करण्याचे आदेश वडिलांच्या मृत्यू प्रकरणी न्याय म...

 भगवान चिपळूणकर लोटे अपघात प्रकरणी दोषी वाहन चालकावर व गाडी मालकावर RTO विभागामार्फत कारवाई करण्याचे आदेश

वडिलांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळविण्यासाठी मुलगा वैभव चिपळूणकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्न

  ⭕ RTO,रत्नागिरी विभागाकडून स्कॉड पथकाद्वारे वाहनावर कारवाईचे आदेश   


योगेश पेढांबकर रत्नागिरी प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

             चिपळूण - लोटे येथे माझे वडील भगवान सखाराम चिपळूणकर रा.कोलेखाजन,चिपळूण हे दि.०६/०५/२०२४ रोजी नेहमीप्रमाणे लोटे बाजार येथे मच्छी व्यवसाय करण्यासाठी मोटार सायकल नंबर-MH08/X/3217 घेवून सुकी मच्छी विकणेकरिता दुपारी- ४.००वाजता आठवडा बाजार आवाशी, लोटे ता. खेड येथे गेलो होते. तेथे सुकी मच्छी विक्री करून ते रात्री ९.४५ वाजता परत मोटार सायकलने चिपळूणकडे येण्यास निघाले. हॉटेल विरंगुळा या ठिकाणी आले असता रॉंग साईडने आलेल्या डब्बल केबिन बोलेरो गाडी (MH08TC 827) (MHO8 AP7436) या गाडीने ठोकर दिली. त्यात गंभीर जखमी झाले. रॉंग साईडने आलेल्या डब्बल केबिन बोलेरो गाडी (MH08TC 827) चालक कु.सुमित शेटप्पा पवार वय-१९ वर्षे याने अपघात करून त्या ठिकाणावरून पलायन केले. व गाडीचालक यांचा परवाना हा ट्रान्सपोर्ट नसून नॉन ट्रान्सपोर्ट असा होता. सदर अपघातग्रस्त गाडी ही श्री.दिनेश संपत पवार, खांदाटपाली यांच्या मालकीची असल्याने  सदर दोन्ही व्यक्तीची कायदेशीर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. माझे वडील रक्ताच्या थारोळ्यात व्हिवळत तिथेच पडून राहिले.प्रत्यक्षदर्शी साक्षीदार श्री.प्रबोध प्रभाकर बापट रा.खडपोली(तळेवाडी) ता.चिपळूण यांनी पोलीस कॉन्स्टेबल उदय संभाजी भोसले लोटे पोलीस दुरक्षेत्र,खेड यांना सविस्तर घटना सांगितली.व सदर चालकावर गुन्हा रजि.क्र १६७/२०२४ असा दाखल करण्यात आला आहे. 

   त्यावेळी सदर घटनेचा पोलिसांकडून तपास करण्यात आला. पंचनामा करतेवेळी खेड पोलिस स्टेशन मधील सहा.पोलिस निरीक्षक श्री.संजय पाटील यांनी सदर गाडी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे दिली नाही.असे लेखी पत्र दि.०७/०७/२०२५ रोजी कार्यालयाकडून प्राप्त झाले.ही कायद्याने हीअतिशय गंभीर बाब आहे. यावर तक्रारदार श्री.वैभव भगवान चिपळूणकर कोलेखाजन,चिपळूण यांनी वारंवार पोलिस विभाग व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यावर आज तब्बल एक वर्ष पूर्ण होत असताना कार्यालयीन आदेश क्रमांक - २८३/२०२५ दि.०९/०९/२०२५ रोजीचे पत्रक काढण्यात आले.व कारवाईचे आदेश RTO,रत्नागिरी विभागाकडून करण्यात आले आहेत.

   धक्कादायक बाब अशी की, तक्रारदार श्री.वैभव चिपळूणकर यांनी   सहा महिन्यांनी चौकशी कायदेशीर करीत असताना सदर आरोपीस पत्रव्यवहार करण्यात आला. तोपर्यंत कोणतीही कार्यवाही उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्याकडून करण्यात आली नाही. खेड पोलीस ठाणे गुन्हा रजि.१६७/२०२४ भा.द.विस.कलम- ३०४(अ),२७९,३३७,३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४ (अ) (ब) या पुण्यातील दोषी वाहन MH- 08AP7436 या वाहनावर कारवाई होण्यावर आदेशित करण्यात आले. त्या अनुषंगाने वाहन तपासणी दरम्यान सदर मोटर वाहन कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी व तसा अहवाल उपप्रादेशिक परिवहन रत्नागिरी विभागाकडे सादर करावा असे आदेश करण्यात आले. व सदर कारवाई करण्यासाठी स्कॉट पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश करण्यात आले आहेत.याबाबत सातत्याने तक्रारदार वैभव चिपळूणकर करणार आहेत. सदर गाडी चालक व गाडीमालक याच्यावर कोणती कारवाई होते. याकडे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे

No comments