जे.टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया उत्सव भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल – व्यास श...
जे.टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया उत्सव
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल – व्यास शिक्षण मंडळ संचालित जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल, यावल येथे नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या सौ. रंजना महाजन मॅडम व इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या सौ. दिपाली धांडे मॅडम यांच्या हस्ते देवी सरस्वती व दुर्गादेवीच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण व नवदुर्गेची आरती करून करण्यात आली. या प्रसंगी इयत्ता नववी व आठवीच्या विद्यार्थिनींनी चारू फेगडे, तेजस्वी पवार, रेश्मा पाटील, वेदिका बावस्कर, कल्याणी फालक, डिंपल पाटील, देविका तळेले, कावेरी चौधरी, विनिता पाटील, मित जैन व हेमेंद्र महाजन यांनी देवीची नऊ रूपे साकारून त्यांचा महिमा नृत्याविष्कारातून सादर केला.
तसेच इयत्ता 3 व 4 च्या हितेश्री न्हावी, वंशिका महाजन, मिताली महाजन, खुशी सावखेडकर, प्रांजल कोळी, निधी रावते, कल्याणी बारी, मायरा पाटील व नेहल महाले या चिमुकल्या विद्यार्थिनींनी नवदुर्गेवरील गाण्यावर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. या सादरीकरणामुळे शाळेचे वातावरण भक्तिमय व उत्साही झाले. यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी दांडिया खेळून नवरात्रोत्सवाचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. राजश्री लोखंडे मॅडम व सौ. गौरी भिरूड मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्तम सहभाग लाभल्याने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. अशा प्रकारे जे.टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये नवरात्रोत्सव मोठ्या आनंदात व सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला.
No comments