adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अडावद येथे रस्ता मोरी बांधकाम व दलित वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांचे भूमिपूजन संपन्न

  अडावद येथे रस्ता मोरी बांधकाम व दलित वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांचे भूमिपूजन संपन्न   चोपडा (संजीव शिरसाठ) (संपादक -:- हेमकांत ग...

 अडावद येथे रस्ता मोरी बांधकाम व दलित वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांचे भूमिपूजन संपन्न 


 चोपडा (संजीव शिरसाठ)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 चोपडा तालुक्यातिल अडावद ते पांढरी रस्ता येथे मोरी बांधकाम करण्याच्या कामाचे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कामाची अंदाजित किंमत आठ लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे. तसेच दलित वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम देखील करण्यात येणार असून त्यासाठीची अंदाजित किंमत पंधरा लाख रुपये आहे. या दोन्ही विकासकामांचे भूमिपूजन चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आण्णासाहेब प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी सचिन महाजन, हरीष पाटील, पी आर माळी सर , लोकेश काबरा, यासु बारेला, पी. डी. महाजन, अमजद कुरेशी, भारती महाजन, चंद्रशेखर साळुंखे, सुर्यभान पाटील, संदीप महाजन, रविंद्र महाजन, मंगल ईंगळ, प्रविण कोळी, रविंद्र कोळी, प्रेमराज पवार, लिलाधर पाटील, रंजना भोई, खेलसिंग बारेला आदी मान्यवर, ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विकासकामांमुळे ग्रामस्थांना पावसाळ्यात होणाऱ्या अडचणींना दिलासा मिळणार असून गावाच्या सौंदर्यवर्धनास हातभार लागणार आहे. या कामांच्या भूमिपूजनानंतर ग्रामस्थांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments