adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जागतिक आयुर्वेद दिनानिमित्त किसान महाविद्यालयात आरोग्य शिबीराचे आयोजन

 जागतिक आयुर्वेद दिनानिमित्त किसान महाविद्यालयात आरोग्य शिबीराचे आयोजन  पारोळा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पारोळा येथील किसान महा...

 जागतिक आयुर्वेद दिनानिमित्त किसान महाविद्यालयात आरोग्य शिबीराचे आयोजन 


पारोळा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पारोळा येथील किसान महाविद्यालयात दि.२३ सप्टेंबर २०२५ रोजी रासयो एकक आणि कुटीर रूग्णालय पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर २०२५ या कालावधीत स्वच्छता आणि जाणीव जागृती पंधरवाडा निमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.  अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाय. व्ही. पाटील, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. डी. बी. साळुंखे, आयसीटीसी सेलचे किशोर पाटील, तांत्रिक सहाय्यक विद्या पाचुरे, बबन महाजन आणि हिलाल पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासयो कार्यक्रम अधिकारी प्रा. काकासाहेब गायकवाड यांनी कैले. मार्गदर्शनपर मनोगतातून पारोळा कुटीर रुग्णालयातील आयसीटीसी सेलचे समन्वयक किशोर पाटील यांनी एडस या विषाणूजन्य आजाराची कारणे, लक्षण, काळजी दक्षता आणि कायदे याबाबत माहीती दिली तर डॉ. डी. बी. साळुंखे यांनी राष्ट्रीय एकता आणि एकात्मता या विषयावर मार्गदर्शन करतांना सरदार वल्लभभाई पटेल यांचे राष्ट्रीय एकात्मतेतील योगदान, कलम ३७० आणि ऑपरेशन सिंदूर व कारगील विजय दिवस यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. वाय. व्ही.पाटील यांनी एडस या विषाणूजन्य आजाराबाबत प्रामुख्याने किशोरवयीन आणि प्रोढ नागरिकांमध्ये जाणीव जागृती होणे काळाची गरज असल्याचे सांगितले. विद्या  पाचुरे, बबन महाजन आणि हिलाल पाटील यांनी २१७ रासेयो स्वंयसेवकाची एचबी, सीबीसी आणि थाॅयराईड चाचणी करून दिली. सुत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. शशिकांत पाटील तर शुभांगी पाटील या रासयो स्वंयसेवक विद्यार्थीनीने मांडलेत. कार्यक्रमास विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments