adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आ. अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवड्यात दिव्यांग लाभार्थ्यांना मदतीचा हात

 आ. अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवड्यात दिव्यांग लाभार्थ्यांना मदतीचा हात  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गा...

 आ. अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवड्यात दिव्यांग लाभार्थ्यांना मदतीचा हात 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

राष्ट्रनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन (दि. १७ सप्टेंबर २०२५) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (दि. २ ऑक्टोबर २०२५) या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत आज दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी यावल तालुक्यातील मौजे यावल येथील भिल्ल वस्ती येथे सामाजिक उपक्रम पार पडला.

*आमदार व प्रशासनाचे मार्गदर्शन*

या उपक्रमाला रावेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमोलदादा हरीभाऊ जावळे व यावल तहसिलदार श्रीमती मोहनमाला नाझिरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

*मान्यवरांची उपस्थिती*

कार्यक्रमाला श्री. बी. एम. पवार (निवासी नायब तहसिलदार, यावल), श्री. मनोज खारे (नायब तहसिलदार, संजय गांधी योजना), श्री. सकावत तडवी (सहाय्यक महसूल अधिकारी, इंदिरा गांधी योजना तहसिल कार्यालय, यावल) उपस्थित होते.

तसेच भारतीय जनता पार्टी यावल शहर उपाध्यक्ष श्री. मुकेश कोळी, युवा शहराध्यक्ष श्री. विशाल शिर्के, कार्यकर्ते श्री. इकबाल तडवी (कोळवद) यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

*दिव्यांग बांधवांसाठी मदतीचा हात*

सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचे अर्ज भरून घेण्यात आले. पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ मंजुरी आदेश देण्यात आले. या माध्यमातून दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देत सेवा पंधरवड्याचे मोल अधोरेखित करण्यात आले.

No comments