adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एक वेळ पोटाला चिमटा घ्या, पण मुलींच्या शिक्षणात तडजोड करू नका--- पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन - सेवा पंधरवड्यात धरणगावात थेट लाभवाटप

  एक वेळ पोटाला चिमटा घ्या, पण मुलींच्या शिक्षणात तडजोड करू नका---  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन - सेवा पंधरवड्यात धरणगावात थेट लाभ...

 एक वेळ पोटाला चिमटा घ्या, पण मुलींच्या शिक्षणात तडजोड करू नका--- 

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन - सेवा पंधरवड्यात धरणगावात थेट लाभवाटप 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव :दि. 19 सप्टेंबर - महिलांच्या हातातील ताकद म्हणजे कुटुंब व समाजाच्या विकासाची हमी आहे. म्हणूनच एक वेळ पोटाला चिमटा घ्या, पण मुलींच्या शिक्षणात तडजोड करू नका. या अभियानामुळे धरणगाव तालुक्यातील १४ शिबिरांमधून आतापर्यंत 21900 पेक्षा जास्त नागरिकांना थेट लाभ मिळाल्याचे नमूद करत पालकमंत्री म्हणाले की, शासनाच्या निधीचा व योजनांचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच आपले ध्येय आहे. गावोगावी जाऊन नागरिकांना योजनांची माहिती द्या. मी स्वतः तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जनतेच्या डोळ्यातले समाधान हीच खरी जनसेवा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती दरम्यान राबविण्यात येत असलेला ‘सेवा पंधरवडा’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान - समाधान शिबिर’ या उपक्रमांतर्गत एस. के. कॉटन जिनिंग, धरणगाव येथे भव्य लाभवाटप कार्यक्रम पार पडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे प्रत्यक्ष वाटप होऊन उपस्थीत नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले.

*लाभवाटपाचा ठसा*

सेवा पंधरवड्यात धरणगाव तालुक्यातील सर्वसामान्यांना थेट शासकीय लाभ मिळावा यासाठी या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर वाटप झाले यात जात प्रमाणपत्र - ३८४, नवीन रेशन कार्ड - ९६, आयुष्मान भारत कार्ड - ३०, स्वयं सहायता गटांना कर्जवाटप - ₹८२ लाख ५० हजारघरकुल लाभार्थी नमुना ८ - ४८ कृषी विभागांतर्गत ट्रॅक्टर - ३ (१ मोठा, २ लहान), नवीन संजय गांधी लाभार्थी - १५३, चाप कटर - १, नांगर - १, दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर - २ , नवभारत साक्षरता अभियानांतर्गत साक्षर व्यक्तींना प्रमाणपत्र - ४२१९ तसेच यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील व खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन मनोज ठाकरे सर यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी कैलास पाटील यांनी मानले. या अभियानामुळे धरणगाव तालुक्यातील शेतकरी, महिलावर्ग, दिव्यांग व दुर्बल घटक यांना थेट न्याय मिळाला असून, सेवा पंधरवड्यातील हे वाटप शासन-जनता दुवा ठरल्याचे समाधान लाभार्थ्यांनी व्यक्त करत होते.

*यांची होती उपस्थिती*

या वेळी खासदार स्मिताताई वाघ, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी सभापती पंचायत समिती मुकुंद नन्नवरे, जि.प. सदस्य पी. सी. आबा पाटील, गोपाल चौधरी, शिवसेना तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, शेखर अत्तरदे, भगवान महाजन, निवासी नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, गटविकास अधिकारी किशोर वानखेडे, रविंद्र चव्हाण सर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, विविध विभाग प्रमुख, आदिवासी बांधव, महिला व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments