त्रंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण प्रतिनिधी-जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील स्वामी ...
त्रंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण
प्रतिनिधी-जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानी परिसरात पत्रकारांना काही पावती फाडणाऱ्या पार्किंगच्या वुसलीवरुन झालेल्या बाचाबाचीतून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. येथे गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती घेणाऱ्या काही व्यक्तींनी, पत्रकारांवर अचानक हल्ला केला. पत्रकार वार्तांकनासाठी त्र्यंबकेश्वरला गेले असता संबंधित पावती फाडणाऱ्यांकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यामध्ये, तीन ते चार पत्रकार जखमी झाले असून त्यांना तात्काळ त्र्यंबकेश्वरच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नाशिकमध्ये आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतल्यानंतर आता पत्रकारांना मारहाण प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार संरक्षण कायदा, जीवे मारण्याचा प्रयत्न, तसेच दंगल माजलेल्या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून तिघांना अटकही करण्यात आली आहे.


No comments