adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंगणवाडी सेविका प्रमाणे आशा स्वयंमसेविकांना भाऊबीज द्या : मागणी

  अंगणवाडी सेविका प्रमाणे आशा स्वयंमसेविकांना भाऊबीज द्या : मागणी  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  यावल : अंगणवाडी ...

 अंगणवाडी सेविका प्रमाणे आशा स्वयंमसेविकांना भाऊबीज द्या : मागणी 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल : अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची भाऊबीज भेट देण्यात येते. हा निर्णय ग्रामविकास, महिला व बालविकास खात्याकडून घेण्यात आला आहे मात्र प्रत्यक्ष घरोघरी जाऊन बाळांचे लसीकरण, गरोदर मातांच्या नोंदणीसह इतरही सर्वेक्षण करणाऱ्या आशांच्या पदरी मात्र वर्षानुवर्षे भाऊबिजेची भेट मिळत नसल्याने आशाची निराशा होत आहे.

राज्यात दोन लाख अंगणवाडी सेविका आहेत. मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच समावेश आहे. यांच्या बँकेच्या खात्यात दिवाळीच्या पर्वावर भाऊबिजेची भेट जमा होते. परंतु, 

राज्यातील ७५ हजार आशा आणि १३ हजार गटप्रवर्तक या भाऊबिजेच्या भेटीपासून वंचित आहेत त्यांनीही भाऊबीज भेट मिळावी अशी आशा आशा सेविकांना लागुन आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत (एनआरएचएम) ग्रामीण भागात आरोग्याच्यासुविधा पुरविण्यासाठी "आशा' स्वयंसेविकांना मानधनावर नियुक्त केले.

 २००५ सालापासून एनआरएचएममध्ये ग्रामीण भागात महिला आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी आणि नियमित आरोग्यामध्ये सुधार कार्यक्रम राबविण्यासाठी आशा कार्यकर्ती राबत आहेत. हजार-दीड हजार लोकवस्तीच्या गावाला एक अशी आशाची नियुक्ती करण्यात आली आहे.

  जिल्ह्याचा काना कोपऱ्या पर्यत असो की दुर्गम भाग, अशा ठिकाणी आशा स्वयंम सेविका पायपीट करीत जाते. त्यांना देण्यात येणारे मानधन तुटपुंजे आहे. परंतु, यात वाढ करण्याची त्यांची मागणी प्रलंबित आहे. तर, दिवाळीत आशांना त्यांच्या मोल म्हणून भाऊबिजेची भेट द्यावी, अशी मागणी  केली जाते परंतु शासन दुजाभाव करीत आहे.

 अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट देताना आशांना मात्र डावलले जात असल्याने आशा स्वंयमसेविका मध्ये नाराजी पसरली आहे

कुटुंब कल्याण कार्यक्रम, डॉट्स, पोलिओ, प्रसूतिपूर्व आरोग्याची काळजी आदी कार्यक्रम आशा इमानेइतबारे पार पाडतात. मात्र, मानधनात वाढ होत नाही, ही व्यथा आहेच. परंतु आशा स्वयंसेविका गरीब, विधवा, परित्यक्ता, गरजू महिला वर्गातील असूनही त्यांना अंगणवाडी सेविकांन मिळतो त्या धर्तीवर भाऊबीज मिळत नाही. आशांकडून वर्षांनुवर्षे ही मागणी केली जाते मात्र याकडे शासन नेहमी दुर्लक्ष करीत आहे.

कोवीड काळात तात्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सन २०२३ मध्ये आशा स्वयमसेविकांना दोन हजार रुपये भाऊबीज जाहीर करून आशा स्वयमसेविकांना दिलाशा दिला मात्र खात्यावर दमडीहि मिळाली नाही म्हणुण आशा स्वयंम सेविका व गटपर्वतक यांच्यात नाराजी पसरली आहे .

No comments