adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एस. डी. चौधरी यांना हिंदी मंडळाचा 'हिंदी सेवा पुरस्कार'; तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

  एस. डी. चौधरी यांना हिंदी मंडळाचा 'हिंदी सेवा पुरस्कार'; तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:...

 एस. डी. चौधरी यांना हिंदी मंडळाचा 'हिंदी सेवा पुरस्कार'; तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा - येथील तालुका हिंदी अध्यापक मंडळाचा 'हिंदी सेवा पुरस्कार - २०२५' महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. डी. चौधरी यांना समारंभपूर्वक नुकताच प्रदान करण्यात आला.

       चोपडा तालुका हिंदी अध्यापक मंडळ व पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे हिंदी दिनानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन विवेकानंद शैक्षणिक व संशोधन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक व या स्पर्धांचे प्रायोजक घन:श्याम अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आपल्या सेवाकाळात हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकाला दिला जाणारा 'हिंदी सेवा पुरस्कार' एस. डी. चौधरी यांना उद्घाटक घन:श्याम अग्रवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच माध्यमिक शालांत परीक्षा २०२५ मध्ये तालुक्यात हिंदी विषयात प्रथम आलेल्या प्रताप विद्या मंदिरातील कु. अश्विनी प्रवीण शिंदे या विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मंचावर विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सुरेखा मिस्त्री, हिंदी मंडळाचे अध्यक्ष के. बी. पाटील (बिडगाव), हिंदी अध्यापक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ए. पी. पाटील हे उपस्थित होते.

उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक तालुका हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष के. बी. पाटील यांनी तर सूत्रसंचालन संजय बारी व आभार प्रदर्शन संजय जाधव यांनी केले. यावेळी एस. डी. चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. तर बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. या सोहळ्याचे सूत्रसंचालन ईश्वर राजपूत यांनी व आभार प्रदर्शन विजय गोसावी यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी हिंदी मंडळाच्या सदस्यांनी यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

लहान गट (शहरी) - प्रथम : सिद्धी प्रवीण पाटील (कस्तुरबा माध्यमिक विद्यालय), द्वितीय : ॠषाली विजय सोनवणे (ऑक्सफ़र्ड इंग्लिश मीडियम स्कूल), तृतीय : लावण्या देविदास बाविस्कर (पंकज प्राथमिक विद्यालय) 

मोठा गट (शहरी) - प्रथम : सानवी अतुल पाटील (विवेकानंद विद्यालय), द्वितीय : कैस खान रजा खान (प्रताप विद्या मंदिर), तृतीय : श्रावणी संतोष राठोड (ऑक्सफ़र्ड इंग्लिश मीडियम स्कूल)

लहान गट (ग्रामीण) - प्रथम : जिज्ञासा तेजपाल पाटील (विद्याभारती माध्यमिक विद्यालय, विरवाडे), द्वितीय : माही प्रवीण पाटील (नूतन माध्यमिक विद्यालय, चुंचाळे), तृतीय : वैष्णवी भीमराव पाटील (कै.ओ गो पाटील माध्यमिक विद्यालय, बिडगाव)

मोठा गट (ग्रामीण) - प्रथम : दिव्यानी ज्ञानेश्वर सोनगिरे( विद्याभारती माध्यमिक विद्यालय, विरवाडे), द्वितीय : वैष्णवी मच्छिंद्र पाटील (नूतन माध्यमिक विद्यालय, चुंचाळे), तृतीय : अनुष्का विजय महाजन (राजेंद्र माध्यमिक विद्यालय, गोरगावले) विजेत्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

No comments