सायबर सुरक्षा व नशामुक्तीवर नूतन मराठा महाविद्यालयात व्याख्यान जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव - येथील जे.डी.एम.व्ही.पी...
सायबर सुरक्षा व नशामुक्तीवर नूतन मराठा महाविद्यालयात व्याख्यान
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव - येथील जे.डी.एम.व्ही.पी.एस नूतन मराठा महाविद्यालय जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सेवा पखवाडा प्रबोधन उपक्रमांतर्गत सायबर सेक्युरिटी व नशा मुक्ती अभियान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ के. बी पाटील, प्रमुख व्याख्याते श्री रवींद्र तायडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. घनश्याम पाटील उपस्थितीत होते.
यावेळी प्रमुख वक्ते श्री रवींद्र तायडे यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईमची माहिती,सोशल मीडिया वापरातील काळजी ,ऑनलाईन व्यवहार सुरक्षितता,तसेच नशेचे दुष्परिणाम,सामाजिक जबाबदारी,आरोग्यदायी जीवनशैली – व्यायाम, योग, क्रीडा याविषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.त्यानंतर उपप्राचार्य डॉ के.बी. पाटील यांनी सायबर क्राईमपासून वाचण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे तसेच तरुणाईने नशेमुक्त समाज घडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होते.
No comments