adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निंभोरा पोलिसांचे भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर संपन्न {शेकडो तरुण युवक युवतीनी घेतला सहभाग }

 निंभोरा पोलिसांचे भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर संपन्न    {शेकडो तरुण युवक युवतीनी घेतला सहभाग }  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेम...

 निंभोरा पोलिसांचे भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर संपन्न

   {शेकडो तरुण युवक युवतीनी घेतला सहभाग } 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

निंभोरा बु: ता: रावेर येथे निंभोरा पोलीस दलाने जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा परिसरातील ग्रामीण भागातील युवकांना पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर  कृषी तंत्र विद्यालयात घेण्यात आले.

   यावेळी सर्वप्रथम मार्गदर्शन शिबिराचे अध्यक्ष  फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी स.पो.नी हरिदास बोचरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. व मान्यवरांचे स्वागत फौजदार अभय ढाकणे यांनी केले. 

        मार्गदर्शन शिबिराला प्रमुख वक्ते म्हणून रावेर येथील वैभव देशमुख व वाघोड येथील दिनेश चौधरी तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की सर्व युवकांनी आत्मप्रेरित अभ्यास करत यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे सांगितले.

 पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिरात सुमारे २०० युवक युवतीनी सहभाग घेतला यावेळी लेखी  सराव पेपर घेण्यात आला यात प्रथम क्रमांक योगेश सदाशिव कचरे द्वितीय धीरज रतिलाल महाजन व तृतीय वैभव कडू सावळे यांनी पटकावला.

             या मार्गदर्शन शिबिराचे नियोजन फौजदार ममता तडवी, पो .का. प्रभाकर ढसाळ, प्रशांत चौधरी व पोलिसांनी केले आभार प्रदर्शन दिपाली पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निंभोरा पोलीस दलातील सर्व पोलीस कर्मचारी होमगार्ड बांधव व कृषीतंत्र विद्यालयाचे अध्यक्ष प्रल्हाद बोंडे व  विद्यालयाचे  शिक्षकवृंद यांनी घेतले.

No comments