उत्कृष्ट पत्रकार म्हणून संतोष लांडे पुणेकरांना मातृभूमी सोशल फाउंडेशनच्या वतीने उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर...!! संभाजी पुरीगोसाव...
उत्कृष्ट पत्रकार म्हणून संतोष लांडे पुणेकरांना मातृभूमी सोशल फाउंडेशनच्या वतीने उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर...!!
संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुणे शहरांच्या ते महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यात करडी नजर असणारे अजिंक्य न्युज महाराष्ट्र न्यूज चे संपादक संतोष लांडे पुणेकरांना आज रोजी
दिनांक ( 28 सप्टेंबर ) रोजी मातृभूमी स्पेशल फाउंडेशन च्या माध्यमांतून उत्कृंष्ट पत्रकार भवन गांजवे चौकांच्या शेजारी निवारा हॉल येथे पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अनुषंगाने संतोष लांडे यांना सन्मानित करून त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाप्रसंगी राजकीय सामाजिक अशा विविध क्षेत्रातील कर्तुत्वान मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देवुन गौरविण्यात आले .
यावेळी अजिंक्य न्यूज चॅनलचे संपादक व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष लांडे पुणेकर व झेप फाउंडेशन पुणे (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक अध्यक्ष व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष कांताभाऊ राठोड यांचा उत्कृंष्ट पत्रकारिता व सामाजिक कार्य राज्यस्तरीय पुरस्कार जगप्रसिद्ध मूर्तीशास्त्रज्ञ श्री .मा.गो.ब देगलूरकर सर यांच्या हस्ते देवुन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे मुख्या अतिथी म्हणून गो.ब देगलूरकर सर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ.महेश थोरवे सर संचालक एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे ,मा . अँड .संग्राम नाथाभाऊ शेवाळे सदस्य युवा धोरण समिती महाराष्ट्र राज्य ,मा. श्री किरण बाळकृष्ण कदम सर संचालक किरण कंट्रक्शन ,मातृभूमी सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अशोक पाटील साहेब, मा .सौ भारतीताई रमेश तुपे संस्थापक अध्यक्ष भारतीय नारी संघटना, मा . सौ श्रद्धाताई गोरक्ष परांडे सौ. श्रद्धाताई गोरक्ष ( आप्पा) परांडे जनहित मंच, मा श्री सुनील सुरेश गोरे अध्यक्ष राष्ट्रभक्ती परिवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे व अतिथी यांनी मार्गदर्शन केले .
या पुरस्कारासाठी महाराष्ट्रभरांतून विविध क्षेत्रातील पुरस्कार्थी उपस्थित होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील 50 पुरस्कार्थीना पुरस्कार देवुन यावेळी गौरवण्यात आले. पुरस्कार देण्यामागे अशोक पाटील सर यांचे असे मत आहे की पुरस्कार हा माणसाला अजून जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा देत व कशा परिस्थितीतून मात करून ध्येयापर्यंत पोहोचतात याची एक शीख, उदाहरण लोकांसमोर उभे राहते या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रम स्थळी चहापाणी,नाष्टयाची सोय करण्यात आली होती.
No comments