भिगवण पोलिसांची दिपावलीपूर्वीची धडाकेबाज कारवाई, अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या...1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत...!! पुणे जिल्हा प...
भिगवण पोलिसांची दिपावलीपूर्वीची धडाकेबाज कारवाई, अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या...1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत...!!
पुणे जिल्हा प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुणे ग्रामीण विभागातील भिगवण पोलीस ठाणेचा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी पदभार घेतल्यापासून भिगवण पोलीस ठाणेच्या हद्दीमधील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील, तसेच अवैध धंद्यावर तसेच गुन्हेगारांवर भिगवण पोलिसांची नेहमीच करडी नजर दिसून येते आहे. भिगवण पोलिसांची दिपावली पूर्वींची दमदार कामगिरी, भिगवण पोलिसांकडून दिवसाढवळ्या घरपोडी करणाऱ्या आरोपींच्या भिगवण पोलिसांनी अगदी शिताफीने आरोपींस ताब्यात घेवुन अटक केली आहे. भिगवण पोलीस पेट्रोलिंग करीत असताना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून एक संशयरित्या इसम मौजे अकोले गावचे हद्दीमध्ये फिरत असल्याची माहिती मिळाली होती. भिगवण पोलिसांनी संशयित इसमाकडे अगदी कसून चौकशी केली असता. सदर संशयित अट्टल आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. भिगवण पोलिसांनी चोरीस गेलेला सोन्या-चांदीचा 3 लाख 13 हजार 992 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत या गुन्ह्यातील आरोपींवर यापूर्वीही 12 गुन्हे दाखल आहेत. गणेश गंगाधर टिंगरे (वय 44) रा. लोहार गल्ली ता. कर्जत जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रथमदर्शनी आरोपींने उडवाउडवीची उत्तरे दिली अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच घरफोडी गुन्ह्याची कबुली आरोपींने दिली. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप गिल अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद माहांगडे पोलिस अंमलदार महेश उगले सचिन पवार संतोष मखरे शहाजी सुद्रींक आदीं पोलिसांनी या कारवाई सहभाग घेतला पुढील तपास महेश उगले करीत आहेत.

No comments