फलटण ग्रामीण पोलीस ठाणेच्या प्रभारी अधिकारी संदीप जगताप यांची नियुक्ती, पोलीस ठाण्याला डॅशिंग अधिकारी मिळाला..!! कु : माधवी गिरी गोसावी ...
फलटण ग्रामीण पोलीस ठाणेच्या प्रभारी अधिकारी संदीप जगताप यांची नियुक्ती, पोलीस ठाण्याला डॅशिंग अधिकारी मिळाला..!!
कु : माधवी गिरी गोसावी प्रतिनिधी. सातारा जिल्हा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे हळुवार वाहू लागले असून. यामध्ये फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांची नुकतीच पोलीस उपाधीक्षक पदावर पदोन्नती झाल्यामुळे फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक म्हणून हे पद चांगलेच रिक्त होते. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी फलटण ग्रामीण आणि फलटण शहर या पोलीस ठाण्याला नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर फलटण शहरांच्या पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून अरविंद काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांची संभाजी पुरी गोसावी यांनी सदिंच्छा भेट घेत साहेबांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या... पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांनी सातारा जिल्हा पोलीस दलात सातारा शहर शिरवळ कोरेगांव अशा विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा दिली. तर तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे दोन वर्षांपूर्वी पुणे ग्रामीण पोलीस दलातून सातारा जिल्हा पोलीस दलात नव्याने रुजू झाले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशावरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून पोलीस निरीक्षक श्री. सुनील महाडिक नेहमीच प्रयत्नशील आणि त्यांच्या कार्यकाळात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सन उत्सव तसेच निवडणुका शांततेत पार पडल्या तसेच गुन्हेगारांवर देखील कायमच करडी नजर राहिली.

No comments