सांगली जिल्हा पोलीस दलात मोठी खांदेपालट, 41 पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या... सांगली जिल्हा प्रतिनिधी. (संपादक -:- हेमकांत गा...
सांगली जिल्हा प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये जवळपास 41 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी काढले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांना बदल्यांची प्रतीक्षा लागून राहिली होती कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या देखील नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. यामध्ये सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व वाहतूक नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक सुहास ठोंबरे यांना मुदतवाढ दिली आहे. (थोडक्यात अधिकारी कुठून कुठे पहा) ज्योतीराम पाटील (कवठेमहाकाळ पोलीस ठाणे ते अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष) संजय हारूगडे (इस्लामपूर ते सायबर पोलीस ठाणे) किरण रासकर (मिरज शहर ते आर्थिक गुन्हे शाखा) प्रवीणकुमार कांबळे (नियंत्रण कक्ष ते कवठेमहांकाळ पोलीस ठाणे) किरण चौगुले (सांगली ग्रामीण ते मिरज शहर) संजय मोरे (सांगली शहर ते जिल्हा विशेष शाखा) प्रदीप सूर्यवंशी (वाचक एक ते नियंत्रण कक्ष) सिद्धेश्वर जंगम (शिराळा ते पलूस) जंबाजी भोसले (नियंत्रण कक्ष ते शिराळा) सागर वरूटे (इस्लामपूर ते शिराळा) विनंतीनुसार बदल्यामध्ये सोमनाथ वाघ (तासगांव ते इस्लामपूर) अरूण सुगावकर (नियंत्रण कक्ष ते सांगली शहर) संग्राम शेवाळे (कडेगांव ते तासगांव) स.पो.नि. आनंदराव गाडगे (सांगली ग्रामीण ते कुपवाड) तसेच पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या देखील जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. नव्या पदस्थापने ठिकाणी जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात रुजू होऊन पदभार देखील स्वीकारला आहे.

No comments