एलएलबी 2nd सेमच्या सर्व विद्यार्थ्यांना Contract 2nd परीक्षेमध्ये सरसकट उत्तीर्ण करा:- जगदीश मानवतकर. वाशिम प्रतिनिधी (संपादक -:- हे...
एलएलबी 2nd सेमच्या सर्व विद्यार्थ्यांना Contract 2nd परीक्षेमध्ये सरसकट उत्तीर्ण करा:- जगदीश मानवतकर.
वाशिम प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिनांक 27/10/2025 रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या LL.B 2nd परीक्षेमध्ये गोंधळ करून Contract 2nd ऐवजी Cyber law पेपर सर्व विद्यार्थ्यांना घेण्यात आला होता ही परीक्षा एल .आर .टी कॉलेज अकोला येथे घेण्यात आली होती या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम तयार झाला आणि बराच वेळ विद्यार्थी हे संभ्रमात होते त्यामुळे जगदीश मानवतकर (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना व राज्य समन्वयक विद्यार्थी एकता जिंदाबाद कृती समिती ) तर्फे निवेदन वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पाठविले. यावेळी असे नमूद करण्यात आले की एलएलबी सेकंड सेम एक्झाम मधील सर्व विद्यार्थ्यांना सरसकट 32 मार्क देऊन पास करावे जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. सविस्तर वृत्त असे की दिनांक 27 10 2025 रोजी अकोला येथील एलआरटी कॉलेजमध्ये एलएलबी सेकंड सेम परीक्षेचा कॉन्ट्रॅक्ट सेकंड हा विषय संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता परंतु संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी यांच्या चुकीमुळे या विषयाऐवजी सायबर लॉ चा पेपर सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आला होता विशेष म्हणजे प्रश्नपत्रिका वर Contract असं लिहिले होते परंतु सर्व प्रश्न हे Cyber law चे होते. त्यामुळे आणखीनच गोंधळ तयार होऊन विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमता तयार झाली बरेच विद्यार्थी हे बाहेर गावावरून या परीक्षेकरिता आले होते त्यामुळे विद्यार्थ्यांचा आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास झाला या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून जगदीश मानवतकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविले आहे की तात्काळ सर्व विद्यार्थी हे परीक्षेमध्ये उत्तीर्ण करा त्यांना कमीत कमी 32 मार्क देऊन सर्व परीक्षांमध्ये उत्तीर्ण करावे तसेच परीक्षेची फी वाढ झाली आहे त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि परीक्षा फी कमी करावी अशी मागणी सुद्धा जगदीश मानवतकर यांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत केली आहे यावेळी एलएलबी सेकंड सेम चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते या निवेदनावर रामदास कालापाड अक्षय इंगोले रवी ठोके आशिष कोकरे अतिश वैरागडे सागर अवचार महादेव आवारे अजय कुरवाडे देवहंस संजय पुंडसे देवा गवळी यांच्यासह बऱ्याच जणांच्या स्वाक्षऱ्या होत्या. वरील मागण्या त्वरित मान्य न झाल्यास अमरावती विद्यापीठवर विद्यार्थ्यांमार्फत भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा जगदीश मानवतकर यांनी दिला आहे.

No comments