adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा भारतीय बौध्द महासभा मार्फत पाच दिवशीय बाल संस्कार शिबीराचे आयोजन

 चोपडा भारतीय बौध्द महासभा मार्फत पाच दिवशीय बाल संस्कार शिबीराचे आयोजन  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)       चोपडा येथे दि. ब...

 चोपडा भारतीय बौध्द महासभा मार्फत पाच दिवशीय बाल संस्कार शिबीराचे आयोजन 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

      चोपडा येथे दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा जळगाव जिल्हा पूर्व शाखा अंतर्गत बौध्द धम्म बाल संस्कार शिबिराचे पंचशील नगरात दि. 28 ऑक्टोबर 2025 ते 01 नोव्हेंबर 2025 या पाच दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. या बाल संस्कार शिबिराचे उदघाट्न नगरसेवक अशोक राजाराम बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. बुद्ध धम्मातील 9 ते 15 वयोगटातील बालकांना धम्म संस्काराचे, विविध विधीचे माहिती व्हावी यासाठी दिवाळी सुटीच्या कालावधीत पाच दिवसात संपूर्ण बौध्द संस्कार विधीचे ज्ञान दिले जाणार आहे.यावेळी तालुकाध्यक्ष बापूराव गिरधर वाणे, शहराध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ, बौद्धचार्य वसंत शिंदे यांनी बौध्द पूजापाठ संस्कार विधी बाबत संस्काराथ्रीना धम्म दिसना व माहिती दिली.रोज शिबिरात 9 ते 1 यावेळेत विविध विषयावर प्रवचकार धम्म देसना देणार आहेत.जास्तीत जास्त बौध्द उपासक, उपासिका यांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय बौध्द महासभेच्या पदाधिकारी यांनी केले आहे.

            आजच्या पहिल्या दिवसी शिबिरात सहभागी बालकांना फलहर धम्मदाते अविनाश गोवर्धन बाविस्कर यांनी दिला.यावेळी अशोक बाविस्कर, बापूराव वाणे, भरत शिरसाठ, रमेश सोनवणे, वसंत शिंदे, दिपक मेढे, अविनाश बाविस्कर उपस्थित होते.

No comments