चोपडा आगारातील वाहकाच्या प्रामाणिकपणा एक लाख सत्तर हजार रुपये असलेली बॅग केली परत चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा :- द...
चोपडा आगारातील वाहकाच्या प्रामाणिकपणा एक लाख सत्तर हजार रुपये असलेली बॅग केली परत
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा :- दिनांक २७ आक्टोबर रोजी चोपडा आगाराची शिवाई बस संभाजीनगर ते चोपडा बस चोपडा बस स्थानकात आल्यावर बसचे वाहक राहुल डि बाविस्कर बिल्ला क्र ३४५१० यांना गाडीत (१,७,०००० /-) एक लाख सत्तर हजार रुपये असलेली बॅग सापडली.सदर बॅग वाहकाने प्रामाणिकपणे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या कडे जमा केली.तपासाअंती सदर बॅग राकेश कुमार दिल्ली, जितेंद्र लक्ष्मण चंदाणानी यांना आगारात बोलवुन त्यांच्या कडे परत केली.यावेळी संदेश क्षिरसागर, नितिन सोनवणे उपस्थित होते.एक लाख सत्तर हजार रुपये असलेली बॅग परत मिळाल्याने राकेश कुमार यांनी वाहक राहुल बाविस्कर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले तसेच आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी केलेले सहकार्याचे आभार मानले.

No comments