💉 औषधाच्या नावाखाली नशेचा धंदा...“शिव मेडिकल”वर पोलिसांचा धडक छापा..!नशेच्या बाटल्यांचा काळाबाजार उघड.. औषध विक्रेत्याकडून 31 हजारांचा मुद...
💉 औषधाच्या नावाखाली नशेचा धंदा...“शिव मेडिकल”वर पोलिसांचा धडक छापा..!नशेच्या बाटल्यांचा काळाबाजार उघड.. औषध विक्रेत्याकडून 31 हजारांचा मुद्देमाल जप्त
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.10):-अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या नशेच्या बाटल्या विकणाऱ्या “शिव मेडिकल” या दुकानावर धाड टाकत ₹31,370 किंमतीच्या नशेच्या इंजेक्शन व बाटल्या जप्त केल्या आहेत. या कारवाईत मेडिकलचा मालक पंकज राजकुमार चव्हाण (वय 21, रा. खंडाळा,ता.श्रीरामपूर) याला अटक करण्यात आली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात नशेचे इंजेक्शन व पदार्थ विक्रेत्यां विरोधात विशेष मोहिम हाती घेण्यात आली होती.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि दिपक मेढे,अंमलदार विजय पवार, राहुल द्वारके,रिचर्ड गायकवाड, सुनिल मालणकर,रमीझराज आतार,चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खंडाळा शिवारातील “शिव मेडिकल” येथे छापा टाकण्यात आला.कारवाई पूर्वी पथकाने औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांना सोबत घेतले. तपासणी दरम्यान एका डमी ग्राहकाला नशेच्या बाटल्या विकताना मेडिकलचा मालक पंकज चव्हाण पकडला गेला.त्यानंतर पथकाने मेडिकल आणि घराची झडती घेऊन ₹31,370 किंमतीचा नशेचा साठा आणि रोख रक्कम जप्त केली.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ.रमीझराजा रफीक आतार यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 914/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 125, 278 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पार पडली.

No comments