शिवरत्न जिवाजी महालेंचे प्रतिमा पूजन... विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव -- येथील कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजा...
शिवरत्न जिवाजी महालेंचे प्रतिमा पूजन...
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव -- येथील कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज व शिवरत्न जिवाजी महालेंचे प्रतिमा पूजन करून अभिवादन केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्वराज्यावर ओढवलेले सर्वात मोठे संकट अफजल खानाच्या रूपात आले होते त्यावेळी ज्यांनी निर्णायक भूमिका बजावली असे शिवरत्न जिवाजी महालेंची आज जयंती होती. शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला त्याच क्षणी सय्यद बंडाने शिवरायांवर केलेला तलवारीचा वार ज्या नररत्नाने परतवला व सय्यद बंडाचा हात कलम केला तो शूरवीर म्हणजे जिवाजी महाले. याच ऐतिहासिक घटनेमुळे इतिहासात नोंद झाली की, "होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी". याच शिवरत्न जिवाजी महालेंच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आणि जिवाजी महालेंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवप्रेमींनी दिलेल्या घोषणांनी शिव स्मारकाचा परिसर दणानून निघाला.
याप्रसंगी उबाठा सेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहर प्रमुख भागवत चौधरी, माजी नगरसेवक किरण मराठे, जितेंद्र धनगर, सुनिल चव्हाण, युवा सेनेचे लक्ष्मण महाजन, विनोद रोकडे, पप्पू सोनार, रणजितसिंग सिकरवार, रमेश पारधी, प्रेमराज चौधरी, प्रल्हाद पारधी, गजानन महाजन, राकेश चौधरी, राजू ठाकूर, भिमा धनगर, अधिकृत पत्रकार संघांचे माजी अध्यक्ष ऍड व्ही एस भोलाणे, विद्यमान अध्यक्ष राजेंद्र वाघ, सामाजिक कार्यकर्ते गोरख देशमुख, बाळू महाजन, सोपान बडगुजर, मोनू शिरसाठ, बापू सोनवणे, जिवाजी सेनेचे तालुका अध्यक्ष रविंद्र निकम, शहराध्यक्ष अमोल महाले, ज्ञानेश्वर झुंजारराव, राजेंद्र फुलपगार, मोहन फुलपगार, सतिष बोरसे, सोपान वारुळे, मनोहर निकम, अमोल निकम, कैलास झुंजारराव, अशोक झुंजारराव तसेच नाभिक समाज बांधव, रा.काँ. शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, जेष्ठ नेते नंदू धनगर, राजेंद्र धनगर, ऍड कैलास मराठे, एकनाथ पाटील, गोपाल पाटील, रमेश महाजन, शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील, मोहीत पवार, सागर महाले, जुनेद बागवान, राहुल पाटील, सागर पारधी यांच्यासह शिवप्रेमी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments