पनवेलच्या तहसीलदार म्हणून आता महिलाराज कर्तव्यदक्ष तहसीलदार मीनल भामरे यांनी स्वीकारला पदभार..!! संभाजी पुरीगोसावी ( रायगड जिल्हा ) प्रत...
पनवेलच्या तहसीलदार म्हणून आता महिलाराज कर्तव्यदक्ष तहसीलदार मीनल भामरे यांनी स्वीकारला पदभार..!!
संभाजी पुरीगोसावी ( रायगड जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पनवेलच्या तहसीलदार पदावर आता महिलाराज यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. मीनल भामरे यांनी पनवेलच्या तहसीलदार म्हणून त्यांनी नुकताच पदभार घेतला आहे. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशावरून मीनल भामरे यांनी पनवेल तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला आहे. यावेळी प्रांताधिकारी पवन चांडक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करीत शुभेच्छा दिल्या. यापूर्वी अप्पर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्याकडे पनवेल तहसीलदार म्हणून पदभार सोपविण्यात आला होता. आज रोजी अखेर मीनल भामरे यांची पनवेलच्या तहसीलदार म्हणून शासनाच्या महसूल खात्याने त्यांची नियुक्ती केली आहे. मीनल भामरे यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्यात सेवा बजावत होत्या.

No comments