घरगुती गॅसचा व्यावसायिक स्फोट..तब्बल 33 लाखांचे गॅस रॅकेट उघडकीस..स्थानिक गुन्हे शाखेने केली टोळी जेरबंद सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -...
घरगुती गॅसचा व्यावसायिक स्फोट..तब्बल 33 लाखांचे गॅस रॅकेट उघडकीस..स्थानिक गुन्हे शाखेने केली टोळी जेरबंद
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.३०):-घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलेंडर अवैधरित्या व्यवसायिक गॅस टाक्यांमध्ये रिफिल करून विक्री करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे सापळा रचून जेरबंद केले.या कारवाईत तब्बल 33,65,500/रू किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
🔹कारवाईचा तपशील :
दि.29 ऑक्टोबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही धाडसी कारवाई करण्यात आली.सदर ठिकाणी संशयित इसम प्रविण नारायण खडके (रा. चिचोंडी पाटील) व त्याचे साथीदार घरगुती गॅस टाक्या व्यवसायिक गॅस टाक्यांमध्ये भरून बेकायदेशीर विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तत्काळ छापा टाकला.
छाप्यात संशयित तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले ते खालील प्रमाणे
1️⃣ प्रविण नारायण खडके (वय 28, रा. चिचोंडी पाटील)
2️⃣ वैभव आंबादास पवार (वय 47, रा. सांडवा)
3️⃣ गणेश पद्माकर भोसले (वय 37, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा)
🔹जप्त मुद्देमाल :
सदर ठिकाणावरून पथकाने पंचनामा करून खालील मुद्देमाल जप्त केला
चार वाहने : ₹25,10,000/-
एच.पी. व भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या 264 भरलेल्या व रिकाम्या गॅस टाक्या : ₹8,31,700/-
गॅस रिफिलिंग मशिन : ₹10,000/-
इलेक्ट्रॉनिक वजनकाटा : ₹5,000/-
👉 एकूण मुद्देमाल — ₹33,65,500/-
🔹कायदेशीर कारवाई :
आरोपींनी शासनाचा परवाना न घेता धोकादायक पद्धतीने घरगुती व व्यवसायिक गॅसचा साठा करून रिफिलिंग केल्याने,त्यांच्या विरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गु. र. नं. 968/2025 अंतर्गत बी.एन.एस. 2023 चे कलम 287, 288,
जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3, 7,
एलपीजी (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश 2000 चे कलम 3(2)(b),गॅस सिलेंडर अधिनियम 2016 चे कलम 43, 45, 46,
स्फोटके अधिनियम 1884 चे कलम 9(b) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🔹मार्गदर्शन व पथक :
ही कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.किरणकुमार कबाडी,पोउपनि.अनंत सालुगडे,
पोलीस.अंमलदार लक्ष्मण खोकले,गणेश लबडे,ह्रदय घोडके, बिरप्पा करमल,शामसुंदर जाधव, भिमराज खर्से,मनोज साखरे, महादेव भांड,उमाकांत गावडे
या पथकाने संयुक्तरित्या केली आहे.
👉 स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई गॅस सिलेंडर रिफिलिंगच्या अवैध व्यवसायावर मोठा आघात मानला जात आहे.

No comments