पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून महिला ( आयएएस अधिकारी ) पवनीत कौर यांनी स्वीकारला पदभार... ( पुणे शहर ) प्रतिनिधी. (संपादक -:...
पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून महिला ( आयएएस अधिकारी ) पवनीत कौर यांनी स्वीकारला पदभार...
( पुणे शहर ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बांधकाम परवानगी, आरोग्य,पाणीपुरवठा,शिक्षण मंडळ सामान्य प्रशासन विधी अशा महत्त्वांच्या खात्याची जबाबदारी असलेल्या पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन यांची केवळ सात महिन्यांतच बदली करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ( स्मार्ट ) चे प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या रिक्त जागेवर नव्याने आयएएस अधिकारी श्रीमती पवनीत कौर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान चंद्रन यांच्या जागेवर नव्याने नियुक्त झालेल्या आयएएस अधिकारी पवनीत कौर सध्या त्या यशोदामध्ये उपसंचालक असून कौर या 2014 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी यशोदा मध्ये उपसंचालक तर अमरावती जिल्हाधिकारी तसेच पुणेतील ड्रायबल रिचार्ज अँन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूच्या आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. तसेच पुण्यात कोरोना काळाच्या महामारीच्या काळातही नागरिकांना आयसीयू बेड मिळत नव्हते अशा काळातही शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयामध्ये समन्वय साधून आयसीयू बेडची संख्या वाढवण्यासाठी काम केलेल्या आयएएस अधिकारी पवनीत कौर यांनी पुण्याच्या मनपा अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. दरम्यान सात महिनेच पुणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत राहिलेले प्रदीप चंद्रन यांच्याकडे बांधकाम परवानगी आरोग्य पाणीपुरवठा शिक्षण मंडळ सामान्य प्रशासन विधी अशी महत्त्वाची खाती होती. मात्र सात महिन्यांमध्ये त्यांनी यापैकी एकही विभागात चमकदार कामगिरी केली नाही. त्यांच्या कालावधीत झालेल्या बदल्या आणि टीडीआरच्या प्रकरणाची मात्र दबक्या आवाजात चर्चा रंगली होती.

No comments