सोलापूरात बार्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी अँड सुप्रिया गुंड-पाटील यांचे नाव फिल्डवर..!! कु : माधवी गिरी गोसावी सोल...
सोलापूरात बार्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी अँड सुप्रिया गुंड-पाटील यांचे नाव फिल्डवर..!!
कु : माधवी गिरी गोसावी सोलापूर जिल्हा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
प्रतिनिधी. सोलापूर जिल्ह्यातील आणि राजकीय क्षेत्रामध्ये कर्दनकाळ जनसंपर्क असणाऱ्या अभ्यासू थेट जनतेशी जनसंपर्क असणाऱ्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्या अँड सुप्रिया गुंड-पाटील यांनी बार्शीच्या राजकारणात एक मोठा भूकंप ! राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुप्रिया गुंड-पाटील यांनी पक्षत्याग करून आता नव्या वाटचालीची सुरुवात केली आहे. नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये आता त्यांचे नाव-अग्रस्थानी आणि राऊत गटांतून उमेदवारीची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सुरू आहे. त्यांच्या या निर्णयाने बार्शीचं राजकारण आता नव्या वळणावर गेलं आहे. राजेंद्र भाऊ राऊत यांच्या गटांकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्या निवडणूक लढवणार आहेत. बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने या पदासाठी शहरांत जोरात हालचाली सध्या सुरू आहेत. आणि या रेसमध्ये अनेक उमेदवारांची चर्चा जरी असली तरी आता अँड सुप्रिया ताई गुंड पाटील यांचे नाव चांगलेच फिल्डवर आहे. सुप्रिया गुंड-पाटील या अभ्यासू संपर्कसंपन्न आणि जनतेशी थेट नातं रोखणाऱ्या नेत्या म्हणून त्यांना चांगलेच ओळखले जाते. स्थानिक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, महिलांसाठी आरक्षित नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत गुंड पाटील या बलाढय उमेदवार ठरू शकतात. शिवाय त्यांचा अनुभव संघटन कौशल्य आणि जनसंपर्क त्यामुळे त्यांच्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. बार्शीतील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असताना अँड सुप्रिया गुंड-पाटील यांच्या निर्णयाने आता आगामी निवडणुकीचा रंगच पलटण्याची चिन्हे चांगलीच दिसू लागली आहेत. गेल्या अनेक वर्षापासून कार्यकर्त्या म्हणून कार्यरत असलेल्या अँड सुप्रिया गुंड पाटील यांनी सच्चा कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून आपला राजकीय प्रवास सुरू केला आहे.

No comments