नॅशनल हायवे क्रमांक 53 वर बेलाड फाट्या नजीक भरधाव कंटेनर ची दुचाकीस जबर धडक ; धडकेत दुचाकी स्वाराच्या डोक्यावरुन कंटेनर गेल्याने दुचाकीस्वा...
नॅशनल हायवे क्रमांक 53 वर बेलाड फाट्या नजीक भरधाव कंटेनर ची दुचाकीस जबर धडक ; धडकेत दुचाकी स्वाराच्या डोक्यावरुन कंटेनर गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापुर:- नॅशनल हायवे क्रमांक 53 वर बेलाड फाट्या नजीक समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनर ने दुचाकीस जबर धडक देऊन दुचाकी स्वाराच्या डोक्यावरून कंटेनर चे चाक गेल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना आज पहाटे साडेआठ वाजे दरम्यान घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,ग्राम झोडगा येथील शरद दशरथ नारखेडे वय 50 हे दुचाकी क्रमांक MH 28 Y 51 54 ने मलकापूर हून नांदुरा कडे जात असताना नांदुऱ्याकडून मलकापूर कडे येणाऱ्या भरधाव कंटेनर क्रमांक HR 38 AG 4739 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून शरद नारखेडे यांच्या दुचाकीला बेलाड फाट्या नजीक जबर धडक दिली धडक दिली या धडकेत कंटेनर चे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांच्या मेंदूचा चुराळा होऊन ते घटनास्थळीच ठार झाले अपघाताची माहिती पोलीस उपनिरीक्षक शिंगारे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांसह धाव घेतली कंटेनर चालकाने कंटेनर सोडून पळ काढला असून कंटेनर शहर पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्या त्या कंटेनर साल का विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उप.नि सिंगारे करीत आहे.
No comments