फैजपूर येथे आयुष्मान भारत कार्ड शिबीराचे आयोजन — नागरिकांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत...
फैजपूर येथे आयुष्मान भारत कार्ड शिबीराचे आयोजन — नागरिकांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथे सर्वसामान्य नागरिकांना केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळवून देण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान भारत कार्ड रेशन कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. ज्यांचे कार्ड लिंक झालेले नाही, त्यांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपले कार्ड ऑनलाईन करून घ्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वाजेपर्यंत भरविण्यात येणार आहे. नागरिकांनी आपले रेशन कार्ड, आधार कार्ड, तसेच इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन शिबिरात उपस्थित राहावे. ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेद्वारे त्वरित आयुष्मान कार्ड मिळवून देण्यात येईल. या योजनेद्वारे पात्र नागरिकांना शासकीय तसेच नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने आपल्या आरोग्य सुरक्षेसाठी हे कार्ड काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आपल्या हक्काचा माणूस सिद्धेश्वर लिलाधर वाघुळदे सर सदैव आपल्या सेवेत या सामाजिक उपक्रमांतर्गत हा शिबिर आयोजित करण्यात आला असून, त्यांचा उद्देश नागरिकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हा आहे.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments