यावल महाविद्यालयात उर्दु विभागातर्फे कथालेखन स्पर्धा संपन्न.. भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मराठा व...
यावल महाविद्यालयात उर्दु विभागातर्फे कथालेखन स्पर्धा संपन्न..
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उर्दू विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली व उपप्राचार्य डॉ हेमंत भंगाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कथा लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत २० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून ग्रामिण, दलित आदिवासी, स्त्रीवादी, वैज्ञानिक, विनोदी आणि कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कथा लिहिल्या.
निलोफर जहां शेख अमिनुद्दीन विद्यार्थीनीला प्रथम, आलिया शेख कबीर द्वीतीय तर शेख हुजैफ आसिफ या विद्यार्थ्यांला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले विद्यार्थ्यांमधील लेखन कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली असल्याचे उर्दु विभाग प्रमुख प्रा इम्रान खान यांनी आपल्या प्रास्ताविकात नमुद केले. परिक्षक म्हणून प्रा इम्रान खान यांनी काम पाहिले तर स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रा. प्रतिभा रावते, प्रा. रत्नाकर कोळी, प्रा हेमंत पाटील, प्रा अक्षय सपकाळे, प्रा नागेश्वर जगताप यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

No comments