रावेर येथे महर्षी वाल्मीक जयंती मोठ्या उत्साहात संपन्न रावेर(प्रतिनिधी) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज रावेर येथे सालाबाद प्रमाणे आद्यकवी...
रावेर येथे महर्षी वाल्मीक जयंती मोठ्या उत्साहात संपन्न
रावेर(प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज रावेर येथे सालाबाद प्रमाणे आद्यकवी रामायणाचे रचैते महर्षी वाल्मीक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . व बस स्थानक समोर रक्तदान शबीराचे आयोजन करण्यात आले ५० व्यक्तिनी रक्तदान केले रक्त संकलन संजीवनी बल्ड बॅकचे सहकार्य लाभले. अनेक मान्यवरांनी व समाज बांधवांनी सहभाग घेतला.कार्यकृमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पुजन भक्ती भावाने करण्यात आले आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून कार्यकमाला सुरुवात करण्यात आली
उत्सव समितीचे अध्यक्ष श्री हरलाल भाऊ कोळी यांनी आपल्या प्रास्ताविकात कोळी समाजाच्या विविध अडचणी सांगितल्या त्यात प्रामुख्याने जात प्रमाणपत्र सुलभ रितीने मिळुन त्यांची पळताळणी सुद्धा त्याच पद्धतीने व्हावी अशी विनंती शासन व लोक प्रतिनिधींना केली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आत्माराम दादा कोळी होते. अशोक भाऊ कांडेलकर, माजी आमदार अरुण दादा पाटील , रावेर यावल चे लोकप्रिय आमदार अमोलभाऊ जावळे यांनी मनोगत व्यक्त केले .
नंतर छोरीया मार्केट पासुन जयंती मिरवणुकीला सुरुवात झाली . व सुदंर अशा मिरवणुकीची पंचायत समीती जवळ सांगता करण्यात आली . माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, प्रभाकर आप्पा सोनवणे, प्रल्हाद पाटील, लोकसभा प्रमुख नंदुभाऊ महाजन, मा कृउबां सभापती श्रीकांत महाजन, पिके महाजन मा. सभापती कविता कोळी, सुनिल राजन लासुरकर, डाँ .संदिप पाटील, पो नि.डॉ विशाल जैस्वाल , सरपंच प्रमोद पाटील, सुरेश धनके, पद्माकर महाजन, सोपान पाटील, राजु भाऊ सुवर्णे, दिनेश पाटील, प्रशांत गाढे, मिलींद अवसरमल, समितीचे सचिव मनोहर कोळी उपाध्यक्ष भूषण तायडे खजिनदार योगेश्वर कोळी, ईश्वर तायडे, बंडुभाऊ कोळी, शिवा भाईजी, चंदकांत कोळी, उमेश गाढे, रविंद्र रायपुरे, गोपाळ कोळी, सदाशिव कोळी, दत्तु गुरुजी, समाधान कोळी , दुर्गादास पाटील , रतिराम तायडे, संदिप महाले, शुभम कोळी, कार्यकर्ते मोठया संखेने हजर होते. सुत्र संचालन सुभाष सपकाळे सर यांनी केले तर आभार संतोष सपकळे आप्पा यांनी मानले तसेच विशेष सहकार्य व चोख बंदोबस्त पो. निरिक्षक सो विशाल जैसस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली PSI तुषार पाटील, पो .सुनिल बंजारी, मुकेश सोनवणे त्याच्या सहकाऱ्यांनी केले.


No comments