adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रोहित झाकर्डे यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू

 आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रोहित झाकर्डे यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू  अमरावती प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अमराव...

 आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रोहित झाकर्डे यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू 


अमरावती प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अमरावती (दि १५) आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते रोहित झाकर्डे यांनी आज अमरावती येथील आदिवासी विकास विभाग कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे गंभीर स्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत झाकर्डे यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून विविध मागण्यांबाबत लेखी पत्रव्यवहार व वैयक्तिक पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे अखेर त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे 


त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत  माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत दाखल केलेल्या अर्जावर झालेल्या प्रशासकीय दिरंगाईची चौकशी करून दोषींवर तात्काळ शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी. अमरावतीतील राजकमल परिसरातील आदिवासी मुलांचे भाडेतत्त्वावरील शासकीय वसतिगृह अत्यंत जीर्णावस्थेत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे. भाडेतत्त्वावर घेतलेल्या ग्रंथालयाचा करार रद्द करून, नव्याने बांधण्यात येत असलेल्या शासकीय ग्रंथालय इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या वापरासाठी खुली करावी. पंडित दीनदयाळ स्वयं योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांची डीबीटी रक्कम तात्काळ त्यांच्या खात्यात वर्ग करावी. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव तालुक्यातील “श्री स्वामी समर्थ अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा, मांगुर टाकळगाव” यांची कायमस्वरूपी मान्यता रद्द करावी.


झाकर्डे यांनी स्पष्ट केले की, “आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष दिले नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. अन्यायाविरुद्धची ही लढाई केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण आदिवासी समाजाच्या अस्तित्वाची आहे.” त्यांनी हेही नमूद केले की, या सर्व मागण्यांकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

या आंदोलनाची सर्व माहिती अमरावती पोलीस आयुक्त, फ्रेजरपूरा पोलीस स्टेशन तसेच प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी यांना देण्यात आली आहे. स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले असून, आदिवासी समाजात या आंदोलनामुळे मोठी जागृती निर्माण झाली आहे.

No comments