जळगांव जिल्ह्यांमध्ये अधिकारी वर्षानुवर्षे एकाच जागी; बदली न करता निवडणूक प्रक्रियेला बाधा ? "राज्यातील लाडक्या अधिकाऱ्यांची तात्काळ ...
जळगांव जिल्ह्यांमध्ये अधिकारी वर्षानुवर्षे एकाच जागी; बदली न करता निवडणूक प्रक्रियेला बाधा ?
"राज्यातील लाडक्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा" :- ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेना तसेच स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना,जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड
विभागीय आयुक्त यांनी तक्रारीची दखल घेत जळगाव जिल्हाधिकारी यांना दिले कारवाईचे आदेश
चोपडा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच मुख्य सचिव विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे दिनांक.२४,२५/०९/२०२५ रोजी ईमेल द्वारे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम नाशिक विभाग नाशिक यांच्या स्तरावरून कारवाई करण्याबाबत दिलेल्या तक्रारी अर्जाच्या नुसार असे की ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेना तसेच स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना,जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड मागणी करतो की जळगाव व राज्यातील अनेक शासकीय कार्यालयांत अधिकारी आणि कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच जागी कार्यरत असल्यामुळे प्रशासनातील निष्पक्षता धोक्यात आली असून निवडणूक प्रक्रियेलाही अडथळा निर्माण होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.या पार्श्वभूमीवर कळवितो की निवडणूक आयोग आणि शासनाकडे मागणी आहे की, जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमधून लाडक्या अधिकाऱ्यांची बदली तात्काळ करण्यात यावी.या मागणीमध्ये नमूद केले आहे की एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे रेंगाळलेले अधिकारी लोकांमध्ये गटबाजी,पक्षपातीपणा आणि भ्रष्टाचारास चालना देतात. निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक पार पाडण्यासाठी अशा अधिकाऱ्यांचे स्थानांतरण अपरिहार्य आहे.शासनाने याबाबत तातडीने आदेश काढून निवडणूक आयोगाला त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यास बंधनकारक करावे., "जर शासनाने अशा लाडक्या अधिकाऱ्यांची बदली तातडीने केली नाही तर नागरिकांचा निवडणुकीवरील विश्वास डळमळीत होईल. निष्पक्ष आणि पारदर्शक लोकशाहीसाठी हा निर्णय आवश्यक आहे."

No comments