निपाणे येथील शेतकऱ्याचा मुलगा राज्यसेवा परीक्षेत राज्यात १११ क्रमांकाने उत्तीर्ण. प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी - (संपादक -:- हेमकांत गायकव...
निपाणे येथील शेतकऱ्याचा मुलगा राज्यसेवा परीक्षेत राज्यात १११ क्रमांकाने उत्तीर्ण.
प्रा. सुधीर महाले प्रतिनिधी -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील हर्षल राजेंद्र पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली राज्यसेवा परीक्षा २०२४ मध्ये क्लास १ अधिकारी म्हणून निवड झाली असून या परीक्षेत महाराष्ट्रभरातून एकूण ४७७ उमेदवार उत्तीर्ण झाले, त्यापैकी हर्षल पाटील यांनी राज्यात १११ वा क्रमांक मिळवला आहे.हर्षल राजेंद्र पाटील हे स्व. उत्तमराव पाटील ( गुरुजी) यांचे नातू, राजेंद्र पाटील यांचे जेष्ठ सुपुत्र, दिनेश पाटील यांचे पुतणे आणि युवा सेना तालुका प्रमुख कमलेश पाटील यांचे मोठे बंधू आहेत.
हर्षल पाटील हे शेतकरी कुटुंबातील असून मर्यादित साधनसंपत्ती असूनही परिश्रम,नियोजन आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
त्यांच्या या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले असल्याचे शिवसेना शिंदे गट चे जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांनी म्हटले आहे.हर्षल यांच्या या उल्लेखनीय यशामुळे निपाणे गावासह एरंडोल तालुक्याच्या शिरापेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे.हर्षल पाटील यांच्या यशाबद्दल गावातील व तालुक्यातील नागरिकांनी कौतुक केले आहे.

No comments