विश्वातील पहिले कवी 'महर्षी वाल्मिकी' आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती विशेष विश्वातील पहिल्या काव्याचे निर्माते म्हणून महर्षी वाल्म...
विश्वातील पहिले कवी 'महर्षी वाल्मिकी'
आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती विशेष
विश्वातील पहिल्या काव्याचे निर्माते म्हणून महर्षी वाल्मीकींना आद्यकवी म्हटले जाते या बाबतची कथा अशी की, वाटमाऱ्या वाल्याचे बालपण, दरोडेखोरी, लुटालुट. त्यानंतर नारदमुनींची झालेली भेट, नारदाच्या उपदेशाने बायको, मुले सर्व संसार सोडून वाल्याचे जपानुष्ठान, रामनामाचा जपत, अंगावर वारुळ, पुन्हा काही वर्षांनी देवर्षी नारदांचे त्या मागनि आगमन इत्यादी कथा सर्वश्रुतच आहे. नारदांनी वारूळातून बाहेर काढल्यानंतर त्यांना वाल्मीकी हे नाव दिले. त्यानंतर तमसा नदीकाळी आश्रम स्थापून आपल्या शिष्यासह ते राहू लागले.
एके दिवशी महर्षी वाल्मीकी आपल्या शिष्यांसह वनात समिधा गोळा करण्यासाठी फिरत असतांना विषय भोगासक्त क्रौंच पक्षाचे एक जोडपे त्यांना दिसले. त्याचवेळी एका पारध्याने त्या जोडीपैकी नरपक्षाचा वेध घेतला. नरपक्षी खाली कोसळला व प्राणांतिक वेदनांनी तुडफडू लागला, हे पाहून त्याची मादी व्याकूळ झाली व आक्रंदन करूीलागली. हे दुःख पाहून वाल्मीकींचे मन अपार करुणेने दुःखासक्त झाले. दुःख वेगाने त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले.
मा निषाद प्रतिष्ठा त्वमगमः शाश्वती साः ।। यत्क्रौञ्श्चमिनुथादे कमवथीः काम मोहितम् ।।
अर्थ : हे निषादा, ज्या अर्थी हे निषादा, ज्या अर्थी क्रौंच पक्षाच्या जोडप्यातील काममोहित झालेला एकाला तू मारून टाकलेस त्यामुळे यापुढे तुला कधीच प्रतिष्ठा लाभणार नाही. आश्चर्य म्हणजे ही शापवाणी श्लोक रुपात बाहेर पडली. पक्षी निधनाच्या शोकाने श्लोकरुप धारण केले आणि अनुष्टम छंदाचा जन्म झाला. या श्लोक रुपाने उच्चारलेल्या ओळीच विश्वासतील प्रथम काव्य होत हे जाणून ब्रह्मदेवांनी नारद कारवी वाल्मीकांना महाकाव्य लिहिण्यांची सुचना केली वाल्मीकीनी त्यांना विचारले, मी महाकाव्य कोणावर माझ्या नायकाबद्दल काही कल्पना आहेत.
सोळा गुणांनी युक्त असा पुरुष पृथ्वीच्या पाठीवर असेल, तर त्याच्यावर आपल्याला महाकाव्य रचनेची इच्छा प्रगट केली. देवर्षी नारदांनी त्यांना लगेच सांगितले, या षोडस गुणांनी युक्त असा पुरूष पृथ्वीवर ईक्ष्वाकू कुलातील राम असेल. यामुळे प्रेषित होऊन वाल्मीकींनी रामायण पूर्ण करून ब्रह्मदेवास ऐकविले. तेव्हा त्या काव्याने प्रभावित होऊन जो पर्यंत या भूतलावर पर्वत, नद्या, जनजीवन अस्तित्वात राहील, तो पर्यंत लोकांमध्ये रामायण प्रचारात राहील असावर ब्रम्हदेवांनी वाल्मीकींना दिला. वाल्मीकींच्या मुखातून बाहेर पडलेला शापोद्वार रामायणा सारख्या महाकाव्याच्या निर्मितीस कारणीभूत ठरला. अशा जगातल्या पहिल्या काव्याचा निर्माता म्हणून महर्षी वाल्मीकींना आद्यकवी म्हणतात
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
मो. 98602 52338


No comments