भारतीय वायु दल चा ९३ वा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा ! श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) श्रीरामपूर शहर आणी ताल...
भारतीय वायु दल चा ९३ वा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा !
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्रीरामपूर शहर आणी तालुक्यातील माजी सैनिकांच्या वतीने भारतीय वायु दल चा ९३ वा वर्धापन दिवस श्रीरामपूर शहरातील शहिद स्मारक या ठिकाणी
मा.प्राध्यापक भास्करराव निफाडे यांच्या हस्ते शहीद स्मारकास पुष्पचक्र वाहून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभाग प्रमुख मा.प्राध्यापक भास्करराव निफाडे आपल्या मनोगतात म्हणाले की, भारतीय वायु सेनेची स्थापना दि.८ ऑक्टोबर १९३२ रोजी (ब्रिटिश कालीन) भारतात झाली. त्याकाळी त्याचे नाव रॉयल इंडियन एयर फोर्स असे देण्यात आले होते व १९४७ साली आपला भारत देश स्वातंत्र्य झाल्यावर या दलाचे नाव बदलून भारतीय वायुसेना दल (इंडियन एअर फोर्स ) असे करण्यात आले. १९३२ ला स्थापन झालेल्या या वायुसेना दलाचे शौर्य कौशल्य आणि समर्पणामुळे भारताने जगभरात एक आगळे - वेगळे स्थान निर्माण केले आहे, भारतीय वायुसेना दलाचे ब्रीदवाक्य नभ स्पृंश्य दिप्तंम (तेजस्वीपणे आकाशाला स्पर्श करा) असा त्याचा अर्थ होतो. भारतीय वायुदल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली वायुदल मानले जाते, अनेक अत्याधुनिक विमानांनी वायुदल सज्ज असुन राष्ट्रीय आपत्ती, नैसर्गिक संकटे तसेच सीमा वरती भागात संरक्षणात्मक कारवायांमध्ये वायुदलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते,आज एअर फोर्स दिनानिमित्त देशभरातील नागरिक व जवान सर्व वीरांना सलाम करत आहेत, त्यांच्या या पराक्रमामुळे आज आपले आकाश सुरक्षित आणि गौरवशाली आहे, आज आपण सर्व ज्येष्ठ सेवानिवृत्त माजी सैनिक मोठ्या हिरीरीने सहभाग घेऊन हा दिवस साजरा करत आहोत त्यामुळे याची आजच्या पिढीला मोठी प्रेरणा मिळत असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी माजी सैनिक संघर्ष समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक मेजर कृष्णा सरदार, पोलीस संघटनेचे माजी अध्यक्ष संजय भोंडवे, संग्राम यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करून वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास मेजर कृष्णा सरदार, बाळासाहेब बनकर , संग्रामजीत यादव , अशोक कायगुडे, चांगदेव धाकतोडे, भगिरथ पवार,शरद तांबे, छायाताई मोटे, गोविंद जगदाळे, घनश्याम मिसळ , कासार, सिन्नरकर , राजू शिंदे, रामदास वाणी असलम शेख ,अनिल लगड, पोलीस संघटनेचे माजी अध्यक्ष संजय भोंडवे, शिंदे, किशोर भोसले मोरे तसेच ५७ महाराष्ट्र बटालियन, एनसीसी चे अनेक कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर बाळासाहेब बनकर यांनी तर आभार प्रदर्शन मेजर अनील लगड यांनी केले.
वृत्त विशेष सहयोग
मेजर कृष्णा सरदार - श्रीरामपूर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments