कै. रामचंद्र बापुपरी पुरीगोसावी (तात्या) यांचे प्रथम पुण्यस्मरण श्रद्धांजली व धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सातारा जिल्हा ...
कै. रामचंद्र बापुपरी पुरीगोसावी (तात्या) यांचे प्रथम पुण्यस्मरण
श्रद्धांजली व धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
सातारा जिल्हा ( प्रतिनिधी ) :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप येथील ज्येष्ठ समाजसेवक, सर्वांच्या आपुलकीने व प्रेमाने “तात्या” म्हणून परिचित असलेल्या कै. रामचंद्र बापुपरी पुरीगोसावी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमिंत्त विविध धार्मिंक कार्यक्रमांचे आयोजन समस्त पुरी गोसावी कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
असुन. सदर कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे वार. मंगळवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी करंजखोप येथे आयोजित करण्यात आला असून. परमपूज्य ओंकार गिरी महाराज यांच्या उपस्थित सकाळी 9 ते 11 ते समाधी महापूजा तसेच चवणेश्वर वारकरी संप्रदाय भजनी मंडळाच्या उपस्थितीत महापूजा व कीर्तन-भजन कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यानंतर दुपारी १२.०० वाजता कैलास वासी तात्यांच्या समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण करण्यात येईल. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविक, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार व ग्रामस्थ यांना उपस्थित राहून तात्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन समस्त पुरीगोसावी कुटुंबीयांकडूंन करण्यात आले आहे. शोकाकुल :- समस्त पुरीगोसावी परिवार करंजखोप ता.कोरेगांव जि. सातारा .
🙏 "तात्यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊ या..." 🙏
No comments