adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेतकरी-शेतमजुरांच्या हक्कांसाठी पातुर्ड्यात हक्क परिषद; नेत्यांचा सरकारवर घणाघाती हल्ला.

  शेतकरी-शेतमजुरांच्या हक्कांसाठी पातुर्ड्यात हक्क परिषद; नेत्यांचा सरकारवर घणाघाती हल्ला.  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवा...

 शेतकरी-शेतमजुरांच्या हक्कांसाठी पातुर्ड्यात हक्क परिषद; नेत्यांचा सरकारवर घणाघाती हल्ला. 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पातुर्डा, १९ ऑक्टोबर २०२५ (प्रतिनिधी): शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, पिक विमा, नुकसान भरपाई आणि शेतमजुरांसाठी स्वतंत्र कल्याण महामंडळाची मागणी जोरदारपणे मांडण्यासाठी स्वराज्य पक्षाच्या नेतृत्वाखाली पातुर्डा येथे राज्यव्यापी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत प्रमुख नेत्यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कठोर शब्दांत टीका करत, २८ ऑक्टोबरला नागपूर येथे होणाऱ्या कर्जमाफी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात बच्चू कडू, महादेव जानकर, दीपक केदार, गजानन पाटील बंगाळे, विठ्ठल राजे पवार, घनश्याम चौधरी, रविंद्र इंगळे आणि उज्वल पाटील चोपडे यांनी उपस्थिती लावली. 


शेतकरी-शेतमजुरांच्या विविध समस्यांवर बोलताना नेत्यांनी सरकार न्याय देण्यात पूर्ण अपयशी ठरल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या दुष्काळ, पूरग्रस्त भागातील नुकसान आणि पिक विम्याच्या अंमलबजावणीतील खोड्या यावर जोर देऊन सरकारला इशारा दिला.बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारवर चांगलाच हल्ला चढवला. "तात्काळ कर्जमाफी जाहीर करा, अन्यथा २८ ऑक्टोबरला नागपूर आंदोलनात लाखो शेतकऱ्यांनी सहभागी होऊन सरकारला धडा शिकवा," असे आवाहन करत त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील नुकसानीकडे लक्ष वेधले.महादेव जानकर यांनी राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यात सरकार अपयशी ठरल्याचे सांगितले. "शेतकऱ्यांमुळे जनता त्रस्त झाली आहे. सरकारला घालवल्याशिवाय या समस्या सुटणार नाहीत," असे ठामपणे सांगत शेतमजुरांसाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी अधोरेखित केली.दीपक केदार यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. "कर्जमाफी आणि नुकसान भरपाईसाठी निर्णायक भूमिका घ्या, अन्यथा मंत्र्यांना तुडविण्यात मागे हटणार नाही," असा स्पष्ट इशारा देत पिक विम्याच्या पारदर्शकतेसाठी लढा देण्याचे ठरवले.प्रांताध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी संबोधनात शेतकरी-शेतमजुरांची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले. "सरकार दखल घेत नाही. शेतकऱ्यांचा संयम तुटला तर सरकारने देशभरातील फौज मंत्रालयावर उभी केली तरी पुरणार नाही. शेतकरी नक्षलवादी रूपाने मंत्रालयावर चालून येतील," असा धडाकाही लावला. त्यांनी शेतमजुरांसाठी कल्याणकारी योजना आणि पिक विम्याच्या सुधारणेसाठी आंदोलनाची रचना केली आहे.या परिषदेत शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. स्वराज्य पक्षाने राज्यभर अशा परिषदा घेऊन नागपूर आंदोलनाची तयारी केली असून, विविध शेतकरी संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे शेतकरी समाजात एकजूट निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.यावेळी विठ्ठल पाटील वखारे, दाऊद शहा,बाबुराव वेरुळकार,अंकुश सुलताने, रोहित ताथोड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बहुसंख्य शेतकरी-शेतमजूर उपस्थित होते. नागपूर आंदोलन यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटनांना एकत्रित होण्याचे आवाहन करण्यात आले असून, राज्यातील शेतकरी चळवळीला नवीन गती मिळाली आहे.

No comments