श्रीमती जी .जी.खडसे महाविद्यालयात" लिंग संवेदना" या विषयावर व्याख्यान संपन्न सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
श्रीमती जी .जी.खडसे महाविद्यालयात" लिंग संवेदना" या विषयावर व्याख्यान संपन्न
सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात पी.एम. उषा अंतर्गत व आय.क्यू.एसी यांच्या संयुक्त विद्यमाने लिंग संवेदना या विषयावर दिनांक 01 /10/25 रोजी कार्यक्रम आयोजित केला.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर संबोधी देशपांडे समाज कार्य महाविद्यालय चोपडा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यात त्यांनी असे म्हटले की लिंग संवेदनशीलता म्हणजे समाजात महिला आणि पुरुषांच्या भूमिका अधिकार आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे होय अशी जागृती निर्माण करून एकमेकांबद्दल सहानुभूतीचे वातावरण निर्माण होऊन सर्वांना समान संधी व स्वतःच्या विकासासाठी वातावरण मिळते तसेच लिंगाच्या आधारे कोणताही भेदभाव न करता समाजात स्त्री आणि पुरुष दोघांना आपल्या क्षमता पूर्णपणे विकसित करण्याची संधी मिळते असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सुरेखा चाटे यांनी केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत महाजन उपस्थित होते तर महाविद्यालयातील पी.एम .उषाचे समन्वयक प्रा. डॉ. अनिल पाटील तसेच सहसमन्वयक प्रा.डॉ. अतुल वाकोडे यांची उपस्थिती होती

No comments