किसान महाविद्यालयात 'सरदार -१५०' निमित्त निबंध स्पर्धा व 'आत्मनिर्भर भारत' शपथ राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश: सरदार पटेल यांच...
किसान महाविद्यालयात 'सरदार -१५०' निमित्त निबंध स्पर्धा व 'आत्मनिर्भर भारत' शपथ
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश: सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम
पारोळा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पारोळा येथील किसान महाविद्यालयातील रासेयो एकक द्वारा देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या १५० व्या जयंतीनिमित्त सरदार-१५० या विषयावर निबंध स्पर्धा आणि आत्मनिर्भर भारत विषयी शपथ घेण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाय. व्ही.पाटील तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपप्राचार्य डॉ.जी.एच सोनवणे होते. प्रस्ताविक मांडणी करतांना रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.के.एस.गायकवाड यांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल माहिती दिली. सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारत सरकार सरदार @ १५० हा राष्ट्रव्यापी अभियान राबवत आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून, युवा पिढीला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्र उभारणीतील अमूल्य योगदानाची आणि एकतेच्या संदेशाची जाणीव करून देण्यासाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सरदार-१५० या विषयावर आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. सरदार पटेल यांचे देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य, ५५० हून अधिक संस्थानांचे एकत्रीकरण करून त्यांनी साधलेली राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिक भारताच्या निर्मितीतील त्यांचे योगदान यांसारख्या विविध पैलूंवर विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांचे प्रभावीपणे सादरीकरण केले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीची आणि कणखर नेतृत्वाची महती अधिक जवळून समजून घेता आली. निबंध स्पर्धेनंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी व उपस्थित विद्यार्थ्यांनी 'आत्मनिर्भर भारत' बनवण्याची सामूहिक शपथ घेतली. भारताला एक विकसित आणि सशक्त राष्ट्र बनवण्यासाठी तसेच देशाची एकता व अखंडता कायम राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय योगदान देण्याचा संकल्प या शपथेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलतांना प्राचार्य डॉ.वाय. व्ही. पाटील यांनी सरदार पटेल यांच्या राष्ट्रप्रेम आणि निःस्वार्थ सेवेच्या मूल्यांचे स्मरण करून, विद्यार्थ्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून देशाच्या विकासात सहभागी होण्याचे आवाहन केले. तर उपप्राचार्य डॉ.जी.एच. सोनवणे यांनी देशभर 'सरदार@१५० अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले जात सुन सरदार पटेल यांचे जीवन आपल्याला एकसंध आणि आत्मनिर्भर भारतासाठी काम करण्याची प्रेरणा देते. अशा स्पर्धांच्या माध्यमातून युवा पिढीला त्यांच्या महान कार्याची जाणीव होऊन निबंध स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना सरदार पटेलांच्या विचारांवर चिंतन करण्याची संधी मिळाली असल्याचे म्हटले. या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. सुत्रसंचालन प्रा. एस. एम. सुर्यवंशी यांनी केले तर आभार अक्षय राजपूत याने मांडलेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.शशिकांत पाटील व रासेयोच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments