अखेर चौगाव किल्ल्याचा महाराष्ट्र प्रादेशिक पर्यटन क्षेत्रात समावेश.आमदार प्रा.चंद्रकांत सोनावणेंच्या प्रयत्नांना यश विश्राम तेले(चौगाव प्र...
अखेर चौगाव किल्ल्याचा महाराष्ट्र प्रादेशिक पर्यटन क्षेत्रात समावेश.आमदार प्रा.चंद्रकांत सोनावणेंच्या प्रयत्नांना यश
विश्राम तेले(चौगाव प्रतिनिधी):
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन योजना सन२०२५-२०२६ अंतर्गत चौगाव किल्ला (त्रिवेणी गड) चौगाव,ता.चोपडा,जि.
जळगांव या किल्ल्याचा महाराष्ट्र प्रादेशिक पर्यटन स्थळांमध्ये समावेश झाला असून चौगाव किल्ला पर्यटन विकासासाठी २ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे .लवकरच विजयगड (चौगाव किल्ला)चौगाव ता.चोपडा येथील किल्ल्याच्या परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे.
यासाठी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी पर्यटनमंत्री शंभुराज देसाई साहेब यांचेकडे पाठपुरावा करुन हा निधी मंजुर केला आहे.
चौगाव येथील हा किल्ला पुरातन ऐतिहासिक असून तो अनेक वर्षांपासून दूर्लक्षित होता . विकासासाठी आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी आपल्या मतदारसंघातील पर्यटनाची शान असलेला हा किल्ल्याच्या विकासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.त्यांचे फलित म्हणून आज शासनाने दोन कोटींचा निधी मंजूर करून तालुक्याचे नाव पर्यटन क्षेत्रात अधोरेखित केले आहे .काही वर्षांपूर्वी येथील तिर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिराला देखील तिर्थक्षेत्राचा "क" दर्जा मिळाला आहे.अखेर जळगाव जिल्ह्यातील एकमेव डोंगरी प्रकारातील चौगाव किल्ल्याचा महाराष्ट्र प्रादेशिक पर्यटन क्षेत्रात समाविष्ट झाल्याने जळगाव जिल्ह्यात अजून एक पर्यटन स्थळ घोषित झाले आहे.
राजा शिवछत्रपती परीवार, छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, चोपडा शिवप्रतिष्ठान, ऐतिहासिक वारसा संवर्धन क्रृती समिती चोपडा व चौगाव सहीत जिल्ह्यातील सर्व दुर्ग सेवकांनी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचे आभार मानलेत.

No comments