लासुर येथे ब्रम्हनिष्ठ स्वामी अखंडानंदजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त किर्तन सप्ताहाचे आयोजन लासुर ता.चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमका...
लासुर येथे ब्रम्हनिष्ठ स्वामी अखंडानंदजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त किर्तन सप्ताहाचे आयोजन
लासुर ता.चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लासूर ता.चोपडा(दि.१)येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी हि ब्रम्हनिष्ठ स्वामी अखंडानंदजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तनी सप्ताहाचे आयोजन दि 2/11/2025 पासून दि 9/11/2025 पर्यंत करण्यात आले असून यात दररोज सकाळी काकड आरती, संध्याकाळी हरीपाठ व रात्री कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून
दि .2/11/2025रोजी ह.भ.प.महेश महाराज अमळनेर,
दि.3/11/2025रोजी ह.भ.प. राजेंद्र महाराज कासोदा,
दि.4/11/2025 रोजी ह.भ.प.संजय महाराज गलवाडे
दि. 5/11/2025 रोजी ह.भ.प.भावेश महाराज विटनेर
दि.6/11/2025 रोजी ह.भ.प.योगेश महाराज वघाडी
दि7/11/2025 रोजी सुर्यभान महाराज शेळगाव,
दि.8/11/2025 रोज ह.भ.प.प्रल्हाद महाराज कळमसरे यांचे कीर्तन होणार दररोज रात्री 8/30वाजता येथिल श्रीराम मंदिरात होणार असून दि 9/11/2025 रोजी ह.भ.प.दिनेश महाराज कंचनपूरकर यांच्या सकाळी 8/30 वाजता काल्याच्या कीर्तनाने कीर्तनी सप्ताहाची सांगता होणार या कीर्तनी सप्ताहात गायनाचार्य व मृदुंर्गाचार्य विठ्ठल भजनी मंडळ लासूर व माऊली भजनी मंडळ हातेड बु।। ह्यांची उपस्थिती लाभणार असून टाळकरी महादेव भजनी मंडळ हिंगोणा,लासूर ,चौगाव,हातेड,चहार्डी,अकूलखेडा,सत्रासेन, गणपूर,मराठे,रोहिणी,भोईटी,अंबा, खामखेडा मामलदे, चुंचाळे तसेच बाहेरील तालुक्यातील गुणी जाणकार टाळकरी मंडळी उपस्थित राहणार असून भाविकांनी किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सप्ताह समिती व लासूर ग्रामस्थांनी केले आहे

No comments