adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्यानगर जिल्ह्यात पंचायत समिती सभापतीपदांचे आरक्षण जाहीर

 अहिल्यानगर जिल्ह्यात पंचायत समिती सभापतीपदांचे आरक्षण जाहीर  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर  (दि.७) – आगामी ...

 अहिल्यानगर जिल्ह्यात पंचायत समिती सभापतीपदांचे आरक्षण जाहीर 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर  (दि.७) – आगामी पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांसाठी सभापतीपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण १४ पंचायत समित्यांमध्ये विविध प्रवर्गांनुसार हे आरक्षण निश्चित करण्यात आले असून, यात अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय तसेच महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार आरक्षणाचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत 

संगमनेर : अनुसूचित जाती (व्यक्ती)

कोपरगाव : अनुसूचित जमाती (महिला)

श्रीरामपूर : सर्वसाधारण (व्यक्ती)

शेवगाव : सर्वसाधारण

राहुरी : सर्वसाधारण

पारनेर : सर्वसाधारण (महिला)

श्रीगोंदा : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

कर्जत : नागरिकांचा मागास प्रवर्ग (व्यक्ती)

राहता : नामनिर्देशित प्रवर्ग (महिला)

नेवासा : नामनिर्देशित प्रवर्ग (व्यक्ती)

पाथर्डी : अनुसूचित जाती (महिला)

नगर : सर्वसाधारण (महिला)

जामखेड : नामनिर्देशित प्रवर्ग (महिला)

अकोले : अनुसूचित जमाती (व्यक्ती)

या आरक्षण घोषणेमुळे आगामी पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला वेग आला असून, स्थानिक राजकीय समीकरणांमध्येही नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

No comments